Kane Williamson: 'थॅंक यू केन विलियमसन..' भारतीय का मानताय न्यूझीलंडचे आभार? सोशल मीडियावर एकच चर्चा

हा सामना श्रीलंका संघासाठी जितका महत्वाचा होता, तितकाच भारतीय संघासाठी देखील महत्वाचा होता
kane williamson
kane williamson Twitter

Kane williamson: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना ड्रॉ होण्याच्या वाटेवर आहे.

या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मदत करणाऱ्या केन विलियमसनचे सोशल मीडियावर आभार मानले जात आहेत.

kane williamson
IND VS AUS 4th test: टीम इंडियाला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज अहमदाबाद कसोटीतून बाहेर..

केन विलियमसन ठरला संकटमोचक..

हा सामना श्रीलंका संघासाठी जितका महत्वाचा होता, तितकाच भारतीय संघासाठी देखील महत्वाचा होता. कारण श्रीलंका संघ पराभूत झाल्यास भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार होता.

शेवटच्या क्षणी असे वाटले होते की, न्यूझीलंड संघ हा सामना गमावणार कारण १ चेंडूत १ धावेची गरज होती. त्यावेळी केन विलियमसनने १ धाव पूर्ण केली आणि न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २८५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना डॅरील मिशेलने ८१ धावांची खेळी केली. तर केन विलियमसनने नाबाद १२१ धावांची खेळी केली.

नेटकऱ्यांनी मानले आभार..

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com