नाद खूळा! कस्तुरी सावेकरने माऊंट मनस्लूवर फडकवला तिरंगा

kasturi savekar
kasturi savekar
Summary

माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी केवळ २०० मीटर अंतर राहिले असताना खराब हवामानामुळे परतलेल्या कस्तुरी सावेकरने पुन्हा एकदा माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी याेजना आखली आहे. सन २०२२ मध्ये तिने एव्हरेस्ट माेहिमेवर जाण्याचा निर्धार केला आहे.

कोल्हापूर : करवीर हायकर्सची गिर्यारोहक करवीर कन्या कस्तुरी दिपक सावेकर kasturi savekar हिने नुकतेच माऊंट मनस्लू mount manaslu या शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला. जागतिक स्तरावर माऊंट एव्हरेस्टसह एकूण चौदा अष्टहजारी शिखरे आहेत त्यापैकी माऊंट मनस्लू या आठव्या क्रमांकाच्या शिखरावर कस्तुरीने चढाई करुन अभिमानास्पद कामगिरी केली आहे. दरम्यान हे शिखर २६७८१ फूटावर (८१६३ मीटर) इतक्या उंचीवर असून या कामगिरीमुळे कस्तुरी ही कोल्हापुरातील सर्वात युवा गिर्यारोहक ठरली आहे. kasturi-savekar-19-yr-old-from-kolhapur-scales-mount-manaslu-sml80

मे महिन्याच्या कालावधीत कस्तुरी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर mount everest होती. परंतु खराब हवामानामुळे तिची ही मोहिम कॅम्प चारवरूच थांबवावी लागली. माऊंट एव्हरेस्ट शिखरच्या चढाईसाठी तिने दोन वर्षे कष्ट घेतल्याचे तिच्या पालकांनी नमूद केले. कस्तुरीचे वडील हे चार चाकी वाहन दुरुस्तीचे मेकॅनिक आहेत. तर आई मनस्विनी या गृहिणी आहेत. कस्तुरीच्या गिर्याराेहणाची आवड पाहता तिच्या पालकांनी तिला नेहमी प्राेत्साहित केले.

kasturi savekar
काेणी असाे अथवा नसाे; सातारची पब्लीक आहे ना बस्स झालं! उदयनराजे

बरीच वर्षे पदभ्रंमती व गिर्यारोहणाच्या माध्यमातून तिची माेहिमेसाठी तयारी सुरू होती. गत वर्षी काेविड १९ मुळे तिची एव्हरेस्ट मोहिम थांबली. त्यानंतर तिने अनेक अडचणींवर मात करत १४ मार्चला ती एव्हरेस्टला रवाना झाली होती. परंतु चक्रीवादळामुळे सुरक्षितेतसाठी कस्तुरी आणि तिच्या चमूला कॅम्प चारवरून तीनवर व पुन्हा कॅम्प दोनवर खाली यावे लागले. आता तिने माऊंट मनस्लू शिखर सर केले आहे.

या माेहिमेसाठी तिने दोन रोटेशननंतर २५ सप्टेंबरला चढाईस प्रारंभ केला. २६ सप्टेंबरला कॅम्प दोनवर ती गेली. त्यानंतर २७ ला कॅम्प तीनवर पोचली. तेथे रात्री पुन्हा चढाईला सुरवात करीत तिने २८ सप्टेंबरला सकाळी सव्वा सातच्या सुमारास मनस्लू शिखरावर देशाचा तिरंग्यासह करवीरचा भगवा ध्वज अभिमानाने फडकवला.

जिद्द आणि कष्टाच्या जाेरावर मोठी स्वप्ने साध्य करता येतात हे कस्तुरीने सिद्ध केले आहे. तिच्या या माेहिमेचा यशानंतर सह्याद्रीतील अनेक युवा गिर्यारोहकांना हिमालयावर चढाई करण्यासाठीचे प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त हाेऊ लागली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com