Viral Video: धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट अन् सचिनसारखा स्ट्रेट ड्राइव्ह! चिमुकल्याची फलंदाजी पाहून बिग बी प्रसन्न; VIDEO केला शेअर

Amitabh Bacchan Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे.
viral video
viral videoinstagram

Viral Cricket Video: भारतात क्रिकेटचा क्रेझ वाढतच चालला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की, त्याने एकदा तरी आपल्या देशासाठी खेळावं.

तसेच अनेकांना असंही वाटतं की, त्याने एमएस धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट आणि विराटसारखा कव्हर ड्राईव्ह शॉट खेळावं. मात्र प्रत्येकाला हे जमेल असं नाही.

मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे.

viral video
IPL 2023 Points Table: RCB साठी 'करो या मरो', पराभुत होताच मुंबई नव्हे तर 'हे' २ संघ थेट करणार Playoff मध्ये प्रवेश
viral video
IPL 2023 Points Table: RCB साठी 'करो या मरो', पराभुत होताच मुंबई नव्हे तर 'हे' २ संघ थेट करणार Playoff मध्ये प्रवेश

अमिताभ बच्चनने शेअर केला व्हिडिओ..

बॉलीवूडचा बेताज बादशाह आणि बिग बी ,म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अप्रतिम फलंदाजी करताना दिसून येत आहे.

या व्हिडिओत हा लहान मुलगा आपल्या घरात सराव करताना तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. यादरम्यान तो एमएस धोनीचा हेलिकॉप्टर शॉट आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राइव्ह शॉट मारताना दिसून येत आहे.

या फलंदाजाने स्ट्रेट ड्राइव्ह शॉट देखील मारला आहे. भल्याभल्या फलंदाजांना हे फटके खेळता येत नाहीत. मात्र हा चिमुकला सहजरित्या हे फटके खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओला हटके कॅप्शन देत, अमिताभ बच्चन यांनी लिहिले की ,'भारताचं भविष्य सुरक्षित हातात आहे.' (Latest sports updates)

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

आतापर्यंत ६.५० लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर अनेकांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे या मुलाला मदत करण्याची मागणी केली आहे. मात्र हा मुलगा कोण आहे, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com