KKR vs GT 1st Inning: गुरबाज- रसलची तुफान फटकेबाजी! गुजरातला विजयासाठी १८० धावांचे आव्हान

KKR vs GT Match Updates: कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे.
kkr vs gt
kkr vs gtsaam tv

https://www.youtube.com/watch?v=gFa7wFPC87M&pp=ygUUc2FhbSB0diBtYXJhdGhpIGxpdmU%3DIPL 2023: कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १७९ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८० धावांची गरज आहे.

kkr vs gt
IPL 2023: ऑरेंज कॅपची लढत आणखी रोमांचक, पर्पल कॅप या गोलंदाजाच्या डोक्यावर

कोलकाता नाईट रायडर्सने केल्या १७९ धावा

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी आला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. तर आक्रमक फलंदाज आंद्रे रसलने २ चौकार आणि ३ षटकार मारले. तर रिंकू सिंगने या डावात १० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी बाद १८९ धावा केल्या आहेत.

राशिद खानचा १०० वा सामना

गुजरात टायटन्स संघाचा अनुभवी गोलंदाज राशिद खानचा हा १०० वा सामना आहे. मात्र या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी करत ५४ धावा खर्च केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नाहीये.

kkr vs gt
IPL 2023 News: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का; मॅच विनर प्लेयर यंदाच्या सीजनमधून बाहेर

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल

कोलकाता नाईट रायडर्स:

एन जगदीसन, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com