kl rahul
kl rahulsaam tv

KL Rahul On Loss: 'हे कसं घडलं हे मला माहित नाही..' हातचा सामना गेल्यानंतर KL Rahul ने केले हात वर

KL Rahul Statement: या पराभवानंतर केएल राहूलने मोठे वक्तव्य केले आहे.

LSG VS GT IPL 2023: शनिवारी आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला विजय मिळवण्यासाठी केवळ १३५ धावांची गरज होती. मात्र लखनऊचा संघ या धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. दरम्यान या पराभवानंतर केएल राहूलने मोठे वक्तव्य केले आहे.

kl rahul
Arjun Tendulkar Costly Over: एका ओव्हरमुळं अर्जुनच्या कारकिर्दीला गालबोट! तिसऱ्याच सामन्यात लाजिरवाणा विक्रम

पराभवानंतर काय म्हणाला केएल राहुल..

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना असे वाटत होते की, लखनऊचा संघ सहजरित्या हा सामना जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेईल. मात्र अंतिम षटकात मोहीत शर्माने पूर्ण सामना फिरवला.

या पराभवानंतर केएल राहुल म्हणाला की , 'हे कसं घडलं हे मला माहित नाही, मात्र हे घडलं आहे. आमचं कुठे चुकलं यावर मी बोट ठेऊ शकत नाही. मात्र एक गोष्ट आहे, आज आम्ही २ गुण गमावले आहेत. हे क्रिकेट आहे. मला वाटलं होतं की आम्ही चांगली गोलंदाजी झाली आहे. १३५ धावा बरोबर होत्या. फलंदाजीमध्ये देखील आम्ही चांगली सुरुवात केली होती. पण अशा गोष्टी घडत असतात.' (Latest sports updates)

kl rahul
Arshdeep Singh Wickets Video: नाद करा पण अर्शदीपचा कुठं! सलग २ चेडूंवर स्टंपचे केले २ तुकडे पाहा VIDEO

तसेच आपल्या फलंदाजीबाबत बोलताना तो म्हणाला की, 'आम्ही या सामन्यात आघाडीवर होतो, मला हा सामना खोलवर घेऊन जायचा नव्हता. मला माझे शॉट्स खेळायचे होते. मात्र त्या २-३ षटकांमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. नूर आणि जयंतच्या गोलंदाजीवर आम्ही चान्स घ्यायला हवा होता. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र आम्ही काही चौकार मारण्याच्या संधी गमावल्या.'

गुजरातचा जोरदार विजय...

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर वृद्धिमान साहाने ४७ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी बाद १३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. गुजरातने या सामन्यात ७ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com