IPL 2022 : पुण्यात KKR-LSG आमने-सामने; कोलकत्यासाठी अस्तित्वाची लढाई

लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्याला रोखण्यासाठी केकेआरला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
IPL 2022 : पुण्यात KKR-LSG आमने-सामने; कोलकत्यासाठी अस्तित्वाची लढाई
kkr vs lsg, ipl 2022saam tv

पुणे : आयपीएलच्या यंदाच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) अजिंक्यपद मिळवण्यासाठी सर्वच संघ प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. प्ले ऑफच्या दिशेनं आगेकूच करण्यासाठी गुणतालिकेत खालच्या स्थानी असणाऱ्या संघांनी सर्वस्व पणाला लावलं आहे.दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata knight riders) आज पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध अस्तित्वाची लढत होणार आहे. सुरुवातीचे चार सामने जिंकत विजयपथावर पोहोचणाऱ्या केकेआरचा सलग पाचवेळा पराभव झाल्याने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे आज पुण्यात सायंकाळी होणाऱ्या लखनऊ (Lucknow super giants) विरुद्धच्या सामन्यात केकेआरला विजय मिळवणं आवश्यक आहे. लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल ( k l rahul) जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्याला रोखण्यासाठी केकेआरला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

kkr vs lsg, ipl 2022
OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; 27 टक्के तिकीट ओबीसींना देणार

कोलकताच्या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात १० सामन्यांमध्ये चारवेळा विजय संपादन करुन ८ गुण मिळवले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत केकेआर आठव्या स्थानी आहे. तर दुसरीकडे लखनऊच्या संघाने आतपार्यंत १० सामने खेळले असून प्रतिस्पर्धी संघांविरोधात सात सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत १४ गुण मिळवणारा लखनऊचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. राहुलने दहा सामन्यांमध्ये दोन शतक ठोकत ४५१ धावांचा पाऊस पाडला आहे. नुकत्याच दिल्ली कॅपिटल्स विरोधात झालेल्या सामन्यातही राहुलने ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे केकेआरचे गोलंदाज उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी आणि सुनिल नारायण पुढे राहुलला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

अशी आहे कोलकता आणि लखनऊची टीम

कोलकता नाइट रायडर्स: अॅरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नीतीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, अशोक शर्मा, पॅट कमिंस, रसिख डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डिकॉक, रवि बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, अवेश खान, एंड्रयू टाय, मार्कस स्टोइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, जॅसन होल्डर.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.