KKR आणि RR मध्ये आज होणार झुंज; राजस्थान जिंकल्यास कोलकत्याच्या अडचणी वाढणार

KKR आणि RR मध्ये आज होणार झुंज; राजस्थान जिंकल्यास कोलकत्याच्या अडचणी वाढणार
kkr vs rajasthan royalssaam tv

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वात (IPL 2022) विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्वच संघांच्या खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावलं आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान गाठून 'प्ले ऑफ'मध्ये लवकरात लवकर पोहचण्यासाठी सर्व संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये होणाऱ्या विजय-पराजयामुळे कभी खुशी.. कभी गम..अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात कोलकता नाईट रायडर्सने (KKR) सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. परंतु, गेल्या पाच सामन्यांमध्ये केकेआरला विजयाचा सूर गवसलेला नाही. सलग पाचवेळा पराभव झालेल्या केकेआरचा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासोबत होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज ७.३० वाजता खेळवला जाणार आहे. केकेआरने आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांमध्ये फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. आज होणाऱ्या कोलकता आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यात केकेआरचा पराभव झाल्यास शाहरुख खानच्या (Shahrukh khan) टीमचं प्ले ऑफमध्ये जाण्याच्या अडचणी वाढणार आहेत.

kkr vs rajasthan royals
....म्हणून चेन्नई सुपर किंग्जच्या 'त्या' खेळाडूवर कॅप्टन कुल धोनी भडकला

राजस्थान रॉयलसाठी 'जॉस द बॉस'

राजस्थान रॉयल संघाचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलर यंदाच्या आयपीएल मोसमात चमकता तारा बनला आहे. बटलरच्या जबरदस्त फॉर्मची सर्वत्र चर्चा होत आहे. ७०.७५ च्या सरासरीनं ५६६ धावा करुन बटलरने ऑरेंज कॅपचा मान पटकावला आहे. बटलरने आतापर्यंच तीन शतक ठोकत राजस्थानला काही सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. तसंच राजस्थानकडे प्रभावी गोलंदाजीही असल्याने अनेक दिग्गज फलंदाजांना त्यांच्या गोलंदाजांनी गारद केलं आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये नुकताच रंगतदार सामना झाला. त्यावेळी मैदानावर दव असल्याने राजस्थानच्या गोलंदाजांना दमदार कामगिरी करता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्सनं राजस्थानवर मात करत सामना खिशात घातला. राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल कमालीचा फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या सिजनमध्ये युजवेंद्र चहलने १३.६८ च्या सरासरीनं १९ विकेट्स घेत गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे.

कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने

आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये एकूण २६ सामने झाले.

१) केकेआरने मिळवला १३ सामन्यांमध्ये विजय

२) राजस्थान रॉयल्सने जिंकले १२ सामने

३) एका सामन्यात निकाल नाही

KKR vs RR संभाव्य प्लेईंग ११

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, डेरिल मिचेल, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन

कोलकाता नाइट रायडर्स : अॅरोन फिंच, वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, टिम साउदी, उमेश यादव, हर्षित राणा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.