LSG New Captain : LSG ला मोठा धक्का! KL Rahul बाहेर! तर 'हा' खेळाडू होणार कर्णधार

KL Rahul Injury Update: लखनऊचे कर्णधारपद कुठल्या खेळाडूला दिले जाईल? जाणून घ्या.
kl rahul
kl rahulsaam tv

LSG VS CSK IPL 2023: गेल्या सामन्यात पराभवाची चव चाखून आलेले संघ आज विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. लखनऊच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण चेन्नई सुपर किंग्ज गेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून पराभूत होऊन आला आहे. तर लखनऊ सुपर किंग्ज संघाला घरच्याच मैदानावर रॉयल किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान लखनऊ सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे केएल राहुल आज खेळणार का? जर तो या सामन्यात खेळला नाही तर त्याच्याऐवजी लखनऊचे कर्णधारपद कुठल्या खेळाडूला दिले जाईल? जाणून घ्या.

kl rahul
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

गेल्या सामन्यात झाला होता दुखापतग्रस्त..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. क्षेत्ररक्षण करत असताना पडला होता. काही मिनिटे तो तसाच पडून होता. त्यावेळी त्याला हलता देखील येत नव्हते.

त्यानंतर संघातील खेळाडूंनी त्याला खांद्याचा आधार देऊन मैदानाबाहेर नेलं होत. त्याच्या दुखापतीबाबत अजून कुठलीच माहिती समोर आली नाहीये तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघाचा भाग असल्यामुळे बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

जर तो आज होणाऱ्या सामन्यातून बाहेर राहिला, तर त्याच्याऐवजी कृणाल पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

kl rahul
Virat Kohli vs Gautam Gambhir : मैदानातच जोरदार राडा, विराट कोहली-नवीन भिडले; नतंर गंभीर सोबत झाला राडा - VIDEO

केएल राहुलची दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणार?

आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती. या संघात केएल राहुलला देखील स्थान दिले गेले आहे.

जर तो पूर्णपणे फिट होऊ शकला नाही तर भारतीय संघाची चिंता वाढू शकते. कारण केएल राहुलला अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

तो या संघात यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो. तसेच इंग्लंडमध्ये खेळताना त्याचा स्ट्राईक रेटही चांगला आहे.

kl rahul
Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com