
Ind vs Aus 4th test ks bharat batting: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशीही भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे.
विराट आणि शुभमनच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. तर केएस भरतने देखील जोरदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
दरम्यान त्याने मारलेल्या सलग २ षटकारांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रिषभ पंतच्या जागी संधी मिळालेल्या केएस भरतला सुरुवातीच्या ३ कसोटी सामन्यांमध्ये एकही मोठी खेळी करता आली नव्हती. मात्र चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४४ धावांची खेळी केली आहे.
यादरम्यान त्याने कॅमेरून ग्रीनच्या षटकात २ गगनचुंबी षटकार आणि चौकार मारत २१ धावा ठोकल्या आहेत.
तर झाले असे की , विराट कोहली आणि केएस भरत भागीदारी करत असताना १३४ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिला चेंडू विराटने डॉट केला आणि पुढील चेंडूवर १ धाव घेत स्ट्राईक केएस भरतला दिली.
त्यावेळी कॅमेरून ग्रीन बाउन्सर चेंडूंचा मारा करत होता. केएस भरतने सलग २ बाउन्सर चेंडूंवर पूल शॉट मारत गगनचुंबी षटकार मारले. या षटकात त्याने २ षटकार आणि १ चौकार मारला. यासह त्याने एकूण २१ धावा गोळ्या केल्या.
विराटने झळकावले २८ वे शतक...
भारतीय संघासाठी महत्वाचा सामना असताना, विराटने पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांदयावर घेतली आहे.
त्याने या डावात २४० चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. तर अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे. २०१९ नंतर हे त्याचे कसोटीतील पहिलेच शतक आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.