Birthday Special: स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या कर्णधारा'विषयी काही गोष्टी
Birthday Special: स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या कर्णधारा'विषयी काही गोष्टीSaam Tv

Birthday Special: स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या कर्णधारा'विषयी काही गोष्टी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिवंगत लाला अमरनाथ (Lala Amarnath) यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 रोजी पंजाबच्या कपूरथला येथे झाला.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिवंगत लाला अमरनाथ (Lala Amarnath) यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 रोजी पंजाबच्या कपूरथला येथे झाला. भारताच्या क्रिकेट इतिहासाबद्दल बोलणे आणि लाला अमरनाथ यांचा उल्लेख नाही असे होणार नाही. लाला अमरनाथ हे स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार (First Indian Captain) म्हणून ओळखले जातात. लाला अमरनाथ भारतासाठी शतक करणारे पहिले फलंदाज आहे. लाला अमरनाथ यांनी 24 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांसह भारतासाठी 186 प्रथम श्रेणी सामने खेळले.

भारतासाठी पहिले शतक झळकावणारे खेळाडू

लाला अमरनाथ यांचे नाव येताच त्यांचा पहिला विक्रम लक्षात राहतो. भारतासाठी पहिले शतक झळकावणारे खेळाडू म्हणजे लाला अमरनाथ. पदार्पणात कसोटी सामन्यात लाला अमरनाथ यांनी इंग्लंडविरुद्ध 1933 मध्ये शतक झळकावले. मुंबईत इंग्लंडने हा सामना जिंकला असला तरी इतिहासात तो आजही अमरनाथ यांच्या शतकामुळे लक्षात आहे.

Birthday Special: स्वतंत्र भारताच्या 'पहिल्या कर्णधारा'विषयी काही गोष्टी
Birth Anniversary: 'रणजी ट्राॅफी' नाव कसे? कोण आहे खेळाडू? जाणून घ्या

स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार

लाला अमरनाथ यांना स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार म्हणूनही ओळखले जाते. 1947-48 मध्ये ऑस्ट्रेलियात गेलेल्या भारतीय संघाची कमान प्रथमच लाला अमरनाथ यांच्याकडे सोपवण्यात आली. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1952 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेला पहिला कसोटी सामना जिंकला. संघाने मालिका 2-1 ने जिंकली.

लाला अमरनाथ भारतीय क्रिकेट संघासाठी 24 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले. त्यांच्या नावावर 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 878 धावा आहेत, तर 45 विकेट्स देखील त्याच्या खात्यात आहेत. त्याचबरोबर लाला अमरनाथने 186 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 10,426 धावा केल्या. अमरनाथ यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ आणि सुरिंदर हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले आहेत, तर तिसरा मुलगा राजिंदर देशांतर्गत संघासाठी क्रिकेट खेळला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com