...म्हणून लसीथ मलिंगा ने केली निवृत्तीची घोषणा

श्रीलंकेचा नाही तर अवघ्या जगातील दिग्गज यॉर्करकिंग म्हणून नावलौकिक असणाऱ्या लसिथ मलिंगा याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती
...म्हणून लसीथ मलिंगा ने केली निवृत्तीची घोषणा
...म्हणून लसीथ मलिंगा ने केली निवृत्तीची घोषणाSaam Tv

वृत्तसंस्था : श्रीलंकेचा नाही तर अवघ्या जगातील दिग्गज यॉर्करकिंग म्हणून नावलौकिक असणाऱ्या लसिथ मलिंगा याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती घेतलेली आहे. यामुळे आता तो लीग क्रिकेट मध्ये देखील दिसणार नाही. काही दिवसाअगोदर त्याने तोंडावर आलेल्या टी- २० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याकरिता इच्छा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर करण्यात आलेल्या संघात त्याला स्थान न मिळाल्यामुळे त्याने आता तडकाफडकी सर्वच क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. मलिंगाने ट्वीट करून सांगितले आहे की, मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला चांगली साथ दिली त्यांचे आभार आहे.

हे देखील पहा-

आता मी पुढील काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा क्रिकेटपटूबरोबर शेअर करणार आहे. यामुळे मलिंगाची खेळाडू म्हणून ‘इनिंग’ संपली असली. तरी येणाऱ्या काळात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळण्याची शक्यता आहे. तब्बल १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला मलिंगाने अलविदा सांगितले आहे. त्याने ३४० सामन्यांत ३० टेस्ट, २२६ वनडे आणि ८४ टी- २० सामने मलिंगाने खेळले आहेत. ज्यात एकूण ५४६ विकेट्स घेत त्याने आपला दबदबा मोठ्या प्रमाणात निर्माण केला होता.

...म्हणून लसीथ मलिंगा ने केली निवृत्तीची घोषणा
तालिबान्यांची पंजशीरमध्ये मोठी कारवाई; २० नागरिकांचा केला खात्मा

आयपीएल मध्ये देखील त्याने मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग निर्माण केला होता. त्याच्या यॉर्करने अनेक फलंदाजांचा थरकाप उडायचा आहे. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकरिता अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पडल्याचे क्रिकेटरसिकांना बघितले आहे. मलिंगाने २०२० च्या मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याने आयपीएल २०२० मधून आपले नाव देखील मागे घेतले होते. दरम्यान त्याने टेस्टमध्ये १०१, वनडेमध्ये ३३८ आणि टी २० मध्ये १०७ विकेट्स घेतले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com