
सध्या श्रीलंकेत आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश या चारही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिका सुरू असताना आयसीसीने वनडे रँकिंगची घोषणा केली आहे.
बाबर आझम नंबर १ वर कायम..
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वनडे फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी कायम आहे. त्याची रेटिंग ८६३ वर जाऊन पोहोचली आहे. तर भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल तिसऱ्या स्थानी होता.
नुकताच जाहिर करण्यात आलेल्या यादीत तो ७५९ रेटिंग पाँइट्ससह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (Latest sports updates)
टॉप १० मध्ये ३ भारतीय..
आयसीसीने नुकताच जाहिर केलेल्या यादीत भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. टॉप १० मध्ये भारतीय संघातील ३ फलंदाजांचा समावेश आहे. ७१५ रेटिंग पाँईट्ससह विराट कोहली आठव्या स्थानी आहे.
तर पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध जोरदार अर्धशतक झळकावले आहे. या खेळीसह त्याने पून्हा एकदा टॉप १० फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. रोहित ७०५ रेटिंग पाँईट्ससह दहाव्या स्थानी पोहोचला आहे.
डेव्हिड वॉर्नरची रँकिंगमध्ये मोठी झेप..
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. याचं फळ त्याला आयसीसी रँकिंगमध्ये मिळालं आहे. ७३९ रेटिंग पाँईट्ससह तो या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
तर पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हकची या रँकिंगमध्ये घसरगुंडी झाली आहे. ७३५ रेटिंग पाँईट्ससह तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.