ICC ODI Rankings: शुबमन गिलची वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप, टॉप ५ फलंदाजांमध्ये एकटाच भारतीय; विराट,रोहित कितव्या स्थानी?

Shubman Gill Latest News: भारतीय फलंदाज शुबमन गिलने टॉप ५ फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे.
ICC ODI Rankings
ICC ODI Rankingssaam tv

Latest ICC ODI Rankings:

श्रीलंकेत आणि पाकिस्तानात आशिया चषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा सुरू असताना आयसीसीने वनडे रँकिंगची घोषणा केली आहे. या यादीत भारताचा युवा स्टार शुबमन गिलचा मोठा फायदा झाला आहे.

या यादीत शुबमन गिल तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. याबाबतीत त्याने पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकला मागे सोडलं आहे. ही यादी जाहीर करण्यापूर्वी शुबमन गिल चौथ्या स्थानी होता. तर इमाम उल हक तिसऱ्या स्थानी विराजमान होता.

ICC ODI Rankings
IND VS PAK: 'मैत्री मैदानाबाहेर, मैदानात फक्त..' IND-PAK खेळाडूंना गप्पा मारताना पाहून गंभीर, विराटसह संपूर्ण संघावर भडकला

अव्वल स्थानी कोण?

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत ८८२ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर रासी वॅन दर डुसेन या यादीत ७७७ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर ७५० रेटिंग पॉइंट्ससह शुबमन गिल तिसऱ्या स्थानी आहे.

ही रँकिंग जाहीर होण्यापूर्वी शुबमन गिलचे रेटिंग पॉइंट्स ७४३ इतके होते. मात्र नेपाळविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद ६८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याच्या रँकिंगमध्ये भर पडली. यासह त्याने इमाम उल हकला मागे सोडलं आहे. (Latest sports updates)

ICC ODI Rankings
Virat Kohli Dance Video: विराटचा पहाडी अंदाज! नेपाळी गाणं वाजताच केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

रोहित विराट कितव्या स्थानी?

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली या यादीत १० व्या स्थानी आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत ११ व्या स्थानी कायम आहे. आयर्लंड संघातील फलंदाज ७२६ रेटिंग पॉइंट्ससह पाचव्या स्थानी आहे.

तर ७२१ रेटिंग पॉइंट्ससह फखर जमान या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. नुकताच वनडे क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेणारा क्विंटन डी कॉक ७१८ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत आठव्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ ७०२ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत नवव्या स्थानी आहे.तर विराट कोहलीचे ६९५ आणि रोहित शर्माचे ६९० रेटिंग पॉइंट्स आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com