Video: Liam Livingstone ने मारला क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार !

पाकिस्तान विरुद्धच्या (PAK vs ENG ) दुसर्‍या टी-20 सामन्यात लियाम लिव्हिंग्स्टनने (Liam Livingstone) आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठोकला आहे.
Video: Liam Livingstone ने मारला क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार !
Liam Livingstone Twitter/ @ECB

पाकिस्तान विरुद्धच्या (PAK vs ENG ) दुसर्‍या टी-20 सामन्यात लियाम लिव्हिंग्स्टनने (Liam Livingstone) आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठोकला आहे. त्याने हॅरिस रऊफच्या चेंडूला थेट स्टेडियमच्या बाहेर फेकले आहे. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या सामन्यात लिव्हिंगस्टोनने 23 चेंडूत 38 धावांची तडफदार खेळी खेळली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शतक ठोकणार्‍या या खेळाडूने दुसर्‍या सामन्यात तीन शानदार षटकार ठोकले. यातून त्याने रऊफच्या (Haris Rauf) चेंडूवर दोन षटकार ठोकले. यातील एक षटकार इतका भयानक होता की चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. आतापर्यंतचा हा सर्वात लांब षटकार असल्याचे सांगितले जात आहे.

षटकार इतका लांब होता की चेंडू थेट रग्बिच्या खेळपट्टीवर जाऊन पडला. इंग्लंडने पाकिस्तानला 45 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान क्रिकेट संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 155 धावा करू शकला.

इंग्लंडकडून शाकिब मकसूदने 3 आणि राशिद खान, मोईन अलीने 2-2 गडी बाद केले. हा विशाल षटकार मारण्यापूर्वी लिव्हिंगस्टोनने शुक्रवारी इंग्लंडकडून खेळताना सर्वात वेगवान टी-20 शतक ठोकले आहे. त्याने केवळ 43 चेंडूत 103 धावा केल्या होत्या.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com