Common Wealth Games 2022 : लवप्रीत सिंहनं केला आजच्या पदकाचा श्री गणेशा; देशास चाैदावे पदक

राष्ट्रकुल स्पर्धेतील आजच्या सामन्यांना प्रारंभ झाला आहे.
lovpreet singh, common wealth games 2022, Weightlifting, Bronze Medal
lovpreet singh, common wealth games 2022, Weightlifting, Bronze Medalsaam tv

Lovpreet Singh : बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) आज (बुधवार) सहाव्या दिवशी भारतीय (india) वेटलिफ्टर लवप्रीत सिंह (Lovpreet Singh) याने कांस्य पदक (bronze medal) पटकावून आजच्या (medal) दिवसाचा श्री गणेशा केला. (India At Common Wealth Games)

वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने (109 किलो) वजनी गटात कांस्यपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये (163 किलो) आणि क्लीन अँड जर्कमध्ये (192 किलो) वजन उचलले. त्याने एकूण (355 किलो) वजन उचलून तृतीय क्रमांक पटकावला. कॅमेरूनचा वेटलिफ्टर ज्युनियर गड्झा याने सुवर्ण आणि सामोआच्या जॅक ओपिलोगीने रौप्यपदक जिंकले.

lovpreet singh, common wealth games 2022, Weightlifting, Bronze Medal
PV Sindhu : आनंदित आहाेत पण..., राैप्य पदक पटकाविल्यानंतर पीव्ही सिंधूची पहिली प्रतिक्रिया

लवप्रीतने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात (157 किलो) दुसऱ्या प्रयत्नात (161) आणि तिसऱ्या प्रयत्नात (163 किलो) वजन उचलले. क्लीन अँड जर्क फेरीच्या पहिल्या प्रयत्नात लवप्रीतने (185 किलो) दुसऱ्या प्रयत्नात (189) आणि तिसऱ्या प्रयत्नात (192) किलो वजन उचलले. लवप्रीतच्या यशामुळं देशास चाैदावे पदक मिळालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

lovpreet singh, common wealth games 2022, Weightlifting, Bronze Medal
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com