LSG vs RCB Weather Update: RCB च्या फॅन्सची चिंता वाढली, आजचा सामना होणार रद्द! मोठं कारण आलं समोर

Lucknow Weather Update: आज लखनऊ सुपर जायंट्स संघाचा सामना रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघासोबत रंगणार आहे.
lsg vs rcb weather report
lsg vs rcb weather report

IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स संघाने या हंगामाची जोरदार सुरूवात केली होती. घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने सलग २ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

त्यानंतर गुजरात टायटंस संघाविरूध्द याच मैदानावर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघ १३६ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला होता.

आज लखनऊ सुपर जायंट्स संघाचा सामना रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघासोबत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यादरम्यान वातावरण कसे असेल जाणून घ्या. (Lucknow Weather Update)

lsg vs rcb weather report
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

कसे असेल लखनऊचे हवामान

या खेळपट्टीवर धावा करणं जरा कठीण जातं. सुरुवातीचे काही शतक खेळून काढल्यानंतर फलंदाज मोठे फटके खेळताना दिसून येऊ शकतात. तरीदेखील फिरकी गोलंदाजांचा सामना करणं कठीण जाईल.

दरम्यान नाणेफेकीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दुपारी लखनऊमध्ये पाऊस पडला आहे. दरम्यान अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे की, हा सामना पावासामुळे रद्द होणारा पहिलाच सामना ठरू शकतो. (Latest sports updates)

lsg vs rcb weather report
MI vs RR IPL Match: सलामीवीर यशस्वीची शतकी खेळी; राजस्थानकडून मुंबईला २१३ धावांचं आव्हान

लखनऊचा आत्मविश्वास वाढला..

गेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध फलंदाजी करताना २५७ धावांचा डोंगर उभारला होता. लखनऊचे फलंदाज जोरदार फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे नक्कीच लखनऊच्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

या खेळपट्टीवर धावा करणं कठीण असलं तरीदेखील गेल्या सामन्यात केलेली कामगिरी पाहता लखनऊचे फलंदाज या सामन्यात देखील मोठी धावसंख्या उभारू शकता.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११ (LSG VS RCB Playing 11)

लखनऊ सुपर जायंट्स:

केएल राहुल (कर्णधार क), काइल मेयर्स, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस/डॅनियल सॅम्स, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, मार्क वुड/नवीन उल हक, आवेश खान आणि यश ठाकूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, शाहबाज अहमद, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, मायकेल ब्रेसवेल/डेव्हिड विली, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि विशाल विजयकुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com