LSG New Jersey: KKR विरुद्धच्या सामन्यात लखनऊचा संघ फुटबॉलची जर्सी घालून उतरणार मैदानात; कारण आहे खूप खास

LSG New Jersey Against KKR: या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघ वेगळी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.
lsg new jersey
lsg new jerseysaam tv

KKS VS LSG, 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आज (२० मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघ वेगळी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

lsg new jersey
IPL 2023 Playoff Equation: दिल्लीच्या विजयाने वाढलं पंजाबचं टेन्शन! तर 'हे' ३ संघ करू शकतात Playoff मध्ये प्रवेश

मोहन बगान क्लबला मानवंदना..

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना अतिशय खास असणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात लखनऊचा संघ हिरवा आणि मरून रंगाची जर्सी घालुन मैदानावर उतरणार आहे.

ही जर्सी घालून ते आशियातील सर्वात जुना फुटबॉल क्लब मोहन बागनला मानवंदना देणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात कर्णधार कृणाल पंड्या, आयुष्य बदोनी आणि मार्कस स्टोईनिस ही जर्सी घालून उभे आहेत. (Latest sports updates)

लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका यांचे फुटबॉल संघ एटीके मोहन बगानमध्येही शेअर्स आहेत. त्यांनी २०२० मध्ये या संघाचे शेअर्स खरेदी केले होते. आता या ऐतिहासिक क्लबचं नाव बदलून मोहन बगान सुपर जायंट्स असे केले जाणार आहे. हा बदल येत्या १ जुनपासुन केला जाणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी..

केएल राहुलच्या अनुपस्थितीत लखनऊ सुपर जायंट्स संघाने जोरदार कामगिरी केली आहे. या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे.

गेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स संघाविरूध्द झालेल्या सामन्यात जोरदार विजय मिळवला होता. लखनऊ सुपर जायंट्स संघाने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत. हा संघ १५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com