Khelo India : शेवटच्या २० सेकंदात महाराष्ट्राच्या मुलींनी मारली बाजी; खाे-खाे मध्ये दुहेरी मुकूट

आज महाराष्ट्रच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उज्जवल य़श मिळविले आहे.
Khelo India : शेवटच्या २० सेकंदात महाराष्ट्राच्या मुलींनी मारली बाजी; खाे-खाे मध्ये दुहेरी मुकूट
khelo india youth games, kho kho, maharashtra bagged two gold saam tv

हरियाणा (khelo india youth games latest marathi news) : येथे सुरु असलेल्या खेलाे इंडिया युथ गेम्स (khelo india youth games) क्रीडा स्पर्धेत आज (साेमवार) खो-खो (kho kho) क्रीडा प्रकारात महाराष्ट्रने (maharashtra) दुहेरी मुकुट पटकाविला. यामुळे महाराष्ट्राच्या पदक तालिकेत वाढ झाली आहे. (khelo india youth games maharashtra bagged gold in kho kho)

मुलींचा अंतिम सामना ओरिसासोबत झाला. अत्यंत उत्कंष्ठावर्धक झालेला सामना महाराष्ट्राने (८-६, ७-९, ६-५ : २१ विरूद्ध २०) एक गुणाने जिंकला. ओरिसाने सुरूवातीपासून महाराष्ट्राला चांगली लढत दिली. पहिल्या डावात महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण करताना ८ गडी बाद केले. ओरिसाचे पहिले तीन गडी टिपण्यात थोडी ढिलाई झाली. ओरिसाचे आक्रमण थोडे बचावात्मक होते. त्यांना महाराष्ट्राचे केवळ सहा गडी टिपता आले. पहिल्या डावात महाराष्ट्राला दोन गुणांची आघाडी मिळाली.

maharashtra girls team after defeating odisha in khelo india youth games.
maharashtra girls team after defeating odisha in khelo india youth games.saam tv

महाराष्ट्राने दुसऱ्या डावात अतिक्रमण करताना शर्थीचे प्रयत्न केले. परंतु सावध झालेल्या ओरिसाचे केवळ सात गडी गारद करता आले. त्यांच्या मुलींनी चांगला बचाव केला. पुन्हा ओरिसाच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राची संरक्षणात पुन्हा थोडी ढिलाई झाली. ओरिसाने अतिक्रमण तीव्र केल्याने आपले ९ गडी त्यांच्या हाती सापडले. पहिल्या डावात आघाडी असूनही ओरिसाने दुसऱ्या डावात स्कोर बरोबरीत आणला. त्यामुळे पुन्हा एक्स्ट्रा इनिंग खेळावी लागली. महाराष्ट्राने तिसऱ्या डावात आक्रमणाची धार कायम ठेवत त्यांचे सहा गडी बाद केले. संरक्षण करताना पाच गडी गमावले. परिणामी महाराष्ट्र एक गुणाने विजयी झाला.

शेवटच्या २० सेकंदात सुवर्ण

ओरिसाने जास्तीच्या डावात पाच गडी बाद करून चुरस निर्माण केली होती. सामना संपण्यासाठी एक मिनिट बाकी असताना श्रेया पाटीलने नाबाद खेळी केली. अगदी २० सेकंद उरली असताना अटीतटीचा प्रसंग ओढावला होता. परंतु तिने उत्कृष्टपणे नाबाद खेळी करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. व्यवस्थापक सुधीर चपळगावकर, चीफ कोच राजेंद्र साप्ते, प्रशांत पवार, सत्येन जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

चमकदार खेळी

प्रीती काळेने १ मिनिट ४५ व २ मिनिट ४० पळतीचा खेळ करीत २ गडीही बाद केले. संपदा मोरेने दोनदा दीड मिनिट व एक मिनिट दहा सेकंद बचाव केला. त्यानंतर सहा गडी बाद करून विजयात मोठा वाटा उचलला. कौशल्या पवार १.५०, १.४०, १.३० पळती व २ गडी बाद केले. जान्हवी पेठे - १.३५, १.३०, २.१०, श्रेया पाटील - १.१०, १.१० व तीन गडी टिपले. वृषाली भोये ४ गडी बाद करून सामना फिरवला. गौरी शिंदे २ गडी तंबूत धाडले. दीपाली राठोडने एक मिनिट पळतीचा खेळ करीत २ गडी टिपले. ओरिसाकडून अर्चना मांझी १.४५, २.१५ व अनया दास १.१५, १.३० पळती केली. समरविका साहूने महाराष्ट्राचे सात गडी बाद केले.

महाराष्ट्राचा जल्लोष

दोन्ही संघांनी विजय मिळवल्याने जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष झाला. त्यानंतर महाराष्ट्राने आणलेल्या ढोलाच्या तालावर महाराष्ट्राने भांगडा केला. त्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमधील खेळाडू सहभागी झाले. त्यामुळे विजयी माहोल बनला. महाराष्ट्राचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील यांच्यासह सर्वच प्रशिक्षकांनी नृत्य करीत जल्लोष केला.

आज झालेल्या क्रीडा स्पर्धानंतर हरियाण राज्य 122 पदकांसह 43 सुवर्ण, 36 राैप्य तसेच 43 कास्यपदक मिळवित प्रथम स्थानावर असून महाराष्ट्र राज्य 112 पदकांसह दुस-या स्थानावर राहिले आहे. यामध्ये 43 सुवर्ण , 36 राैप्य and 33 कास्यपदकांचा समावेश आहे.

टेबल टेनिसमध्ये दिपितने सुवर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सुवर्णपदकांची संख्या 43 वर पाेहचली आहे.

khelo india youth games, kho kho, maharashtra bagged two gold
खेला इंडियात चमकली साता-याची आदिती स्वामी; आर्चरीत महाराष्ट्रास सुवर्ण
khelo india youth games, kho kho, maharashtra bagged two gold
खेलो इंडियात सुदेष्णा शिवणकरची सुवर्ण कामगिरी; मैदानी स्पर्धेत महाराष्ट्रास १२ पदके
khelo india youth games, kho kho, maharashtra bagged two gold
CWG: संघातून वगळल्याने न्यायालयात धाव घेतलेली दिया चितळे करणार देशाचे प्रतिनिधित्व

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com