Maharashtra Kesari: थरार लालमातीचा! लेक अंतिम फेरीत अन् गावात आई बापाचा हनुमानाला अभिषेक, राक्षेवाडीच्या शिवराजसाठी आई वडिलांची प्रार्थना

एकीकडे पोरानं महाराष्ट्र केसरीच्या मैदान मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे तर दुसरीकडे लेक महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी आई वडीलांनी हनुमान मंदिरात अभिषेक केलायं. ही बातमी आहे, पुण्यातील महाराष्ट्र केसरीच्या मैदानाची.
Maharashtra Kesari
Maharashtra KesariSaam Tv

Pune: एकीकडे पोरानं महाराष्ट्र केसरीच्या मैदान मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे तर दुसरीकडे लेक महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी आई वडीलांनी हनुमान मंदिरात अभिषेक केलायं. ही बातमी आहे, पुण्यातील महाराष्ट्र केसरीच्या मैदानाची.

पुण्याच्या राजगुरुनगर येथे शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम गटात धडक मारली आहे यावेळी शिवराज महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी आई वडीलांनी हनुमान मंदिरात अभिषेक केला आहे. (Pune News)

Maharashtra Kesari
Kolhapur : कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचं आगीवर नियंत्रण

 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे. पुण्यातील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी इथं महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी आज अंतिम फेरी सायंकाळी होणार आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज अंतिम लढत रंगणार आहे महाराष्ट्र केसरी याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.याताच पुण्यातील राजगुरूनगर येथील शिवराज राक्षे अंतिम फेरीत दाखल झाला असताना त्याने महाराष्ट्र केसरी व्हावं यासाठी त्याच्या मूळ गावी राक्षेवाडी येथील हनुमान मंदीरात देवाकडे साकडं घालत त्याचे आई वडील अभिषेक करत आहेत.

Maharashtra Kesari
Makar Sankranti 2023 : मांजा पकडण्यासाठी धावणारा चिमुरडा रेल्वेखाली चिरडला; नागपूरसह नगर, नाशकात दुर्घटना

दरम्यान, अंतिम फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. (Maharashtra Kesari)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com