IPL 2022 Auction: 6 सीझनमध्ये 4 अर्धशतकं तरीही पठ्ठ्याला 11 कोटी!

फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर स्टॉइनिसने आतापर्यंत 914 धावा केल्या आहेत. मात्र त्याच्या नावावर फक्त चार अर्धशतके आहेत.
IPL 2022 Auction: 6  सीझनमध्ये 4 अर्धशतकं तरीही पठ्ठ्याला 11 कोटी!
IPL 2022 AuctionSaam TV

केएल राहुल आयपीएल 2022 मध्ये लखनऊ संघाचा कर्णधार बनणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी लखनऊ संघाने आपल्या ड्राफ्टमधून खरेदी केलेल्या खेळाडूंपैकी राहुल (KL Rahul) एक असल्याचे समजते आहे. उर्वरित दोन खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई. राहुल गेल्या दोन मोसमात पंजाब किंग्जचा (PBKS) कर्णधार होता परंतु तो संघासोबत राहणार नाही. बिश्नोई पंजाब संघात होता तर स्टॉइनिस दिल्ली संघाचा भाग होता. RPSG ग्रुपने लखनौचा संघ 7090 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

ESPNcricinfo ने वृत्त दिले आहे की लखनऊ संघ केएल राहुलला 15 कोटी, मार्कस स्टॉइनिसला (Marcus Stoinis Auction) 11 आणि रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) 4 कोटीमध्ये विकत घेणार आहे. राहुल आणि बिश्नोईचा विचार केला तर ही रक्कम योग्य आहे, पण स्टॉइनिससाठी 11 कोटी रुपये…? स्टॉइनिस 2015 पासून आयपीएलशी जोडला गेला आहे आणि 2016 पासून खेळत आहे. पण आयपीएल 2020 व्यतिरिक्त, कोणत्याही मोसमात तो संपूर्ण सामने खेळू शकला नाही किंवा त्याने आपल्या बॅटमधून काही खास कामगिरी केली नाहिये. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 56 सामने खेळले असून 30 बळी घेतले आहेत. त्याची इकोनॉमी 9.50 आहे. 2020 चा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम होता ज्यात त्याने 13 विकेट घेतल्या होत्या.

IPL 2022 Auction
IPL 2022 Auction: ठरलं! हार्दिक, राशिद, गिलला 'या' संघाकडून मोठी लॉटरी!

सहा हंगामात फक्त चार अर्धशतके

फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर स्टॉइनिसने आतापर्यंत 914 धावा केल्या आहेत. मात्र त्याच्या नावावर फक्त चार अर्धशतके आहेत. 2020 मध्ये सर्वाधिक 352 धावा केल्या. त्याच मोसमात तो तीन अर्धशतक करू शकला. त्याच मोसमात त्याचा स्ट्राइक रेट (148.52) होता. तो पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांसाठी खेळला आहे. पण कोणत्याही संघात त्याने विशेष कामगिरी केली नव्हती. याचा सरळ अर्थ असा आहे की संघांनी त्याला घेतले पण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

प्रशिक्षक रिकी पाँटिंगमुळे त्याला दिल्ली कॅपिटल्समध्ये संधी मिळाली. या संघाने आयपीएल 2020 मध्येही चांगला खेळ दाखवला. पण 2021 मध्ये पुन्हा अपयश आले. त्याला 10 सामन्यात केवळ 89 धावा करता आल्या. नाबाद 27 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचबरोबर गोलंदाजीत 19.3 षटके टाकूनही एक विकेट मिळवता आली.

मार्कस स्टॉइनिसला 2018 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त पैसे देवून विकत घेतले होते. जेव्हा पंजाब किंग्सने त्याला 6.2 कोटी रुपयांना घेतले होते. मात्र लगेच पुढच्या हंगामात त्याला आरसीबीने विकत घेतले होते. आरसीबीनेही त्याला एक हंगाम ठेवल्यानंतर सोडले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता त्याला लखनऊच्या टीमकडून 11 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजे पगार दुप्पट. जर त्याने लिलावात भाग घेतला असता तर त्याला ही रक्कम क्वचितच मिळाली असती. त्यामुळे लखनऊ संघाचा हा निर्णय किती योग्य ठरतो हे आगामी काळच सांगेल.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.