IND VS AUS 3rd test: आता तरी रडणं सोडा; पराभव समोर दिसू लागल्यानं ऑस्ट्रलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेवटी बडबडलाच!

ऑस्ट्रलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क वॉ यांनी इंदूरच्या खेळपट्टीवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे
Mark waugh
Mark waugh Saam tv

IND VS AUS 3rd Test Mark waugh statement: इंदूरच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र ऑस्टेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा कार्यक्रम केला. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्टात आला आहे. दरम्यान ऑस्ट्रलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क वॉ यांनी इंदूरच्या खेळपट्टीवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मार्क वॉ यांनी इंदूरच्या खेळपट्टीवरून मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी इंदूरची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणन्यानुसार नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्टीपेक्षा इंदूरच्या खेळपट्टीवर चेंडू जास्त फिरतोय.

Mark waugh
Ind vs Aus 3rd Test: युवी नव्हे तर 'हा' आहे टीम इंडियाचा 'सिक्सर किंग', मोठ्या विक्रमात विराटची बरोबरी करत रवी शास्त्रींना सोडलंय मागे

पहिल्या डावात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी..

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय संघाचा डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला होता.

Mark waugh
IND VS AUS 3rd Test: अखेर अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे, बनला भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज

ऑस्ट्रेलिया संघाकडून कुन्हेमनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर नॅथन लायनने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाचा डाव देखील अवघ्या १९७ धावांवर संपुष्ठात आला. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ तर आर अश्विन आणि उमेश यादवने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

मार्क वॉने खेळपट्टीवर टीका करत म्हटले की,'ही खेळपट्टी नसून आपत्ती आहे. कसोटी क्रिकेटसाठी ही खेळपट्टी योग्य नाही.' या सामन्याच्या पहिल्या दिवशी १४ विकेट्स पडल्या होत्या. या सर्व विकेट्स फिरकी गोलंदाजांनी पटकावल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com