Breaking News: IND vs ENG पाचवा कसोटी सामना रद्द

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) पाचवा सामना (Fifth Test Match) रद्द करण्यात आला आहे.
Breaking News: IND vs ENG पाचवा कसोटी सामना रद्द
IND vs ENG Twitter/@BCCI

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) पाचवा सामना (Fifth Test Match) पुढे ढकलण्यात आला आहे. भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तीकने ट्विट करत सामना पुढे ढलण्याचे संकेत दिले होते. आता सामना रद्द करण्यात आला आहे. कार्तीकने संकेत दिलेच होते फक्त अधिकृत घोषणा बाकी होती. भारतीय संघाचे फिजीओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. या अगोदर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात जवळपास ३१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारपासून (10 सप्टेंबर) मँचेस्टरमध्ये खेळला जाणार होता. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर भारताने लॉर्ड्सवर विजय मिळवला. लीड्समध्ये इंग्लंड जिंकला. टीम इंडियाने द ओवल येथे चौथ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मालिकेत 2-1 अशी अतुलनीय आघाडी घेतली.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com