IPL 2022 Play Off : दोन स्थानांसाठी आता तीन संघांमध्ये टक्कर, वाचा सविस्तर माहिती

गुणतालीकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहण्यासाठी पाच संघांमध्ये महत्वाच्या लढती होणार आहेत.
IPL 2022 update
IPL 2022 updatesaam tv

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वात (Ipl 2022) एकाहून एक रंगतदार लढती होत असून आता साखळी सामान्यांचे मोजकेच सामने शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सर्व संघांचे १-१ सामने शिल्लक राहिले आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) हे दोन्ही संघ प्ले ऑफसाठी क्वॉलीफाय झाले आहेत. इंडियन प्रिमियर लीगच्या २०२२ च्या हंगामात १८ मे पर्यंत ६६ सामने झाले आहेत. दरम्यान, ग्रुप स्टेजचे फक्त चार सामने उरले असून प्ले ऑफमध्ये दोन संघ पोहोचले आहेत.

IPL 2022 update
धक्कादायक! प्रियकराच्या घरातच प्रेयसीने घेतला गळफास; कारण ऐकून पोलिसही हैराण

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारी गुजरात टायटन्सची टीम गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी लखनऊची राजस्थानच्या संघासोबत टक्कर आहे. आता इतर दोन स्थानांसाठी पाच संघामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. गुणतालीकेतील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहण्यासाठी पाच संघांमध्ये महत्वाच्या लढती होणार आहेत. यामध्ये राजस्थना रॉयल्ससह दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघ मोठे दावेदार असणार आहेत. या संघांनी आतापर्यंत १४ गुण मिळवण्याची कामगिरी केली असून राजस्थानला १६ गुण मिळाले आहेत.

लखनऊ आणि कोलकताचा संघ सोडला तर इतर सर्व संघाचे १-१ सामने शिल्ल्क राहिले आहेत. दिल्ली आणि बॅंगळुरुपैकी कोणत्याही एका संघाचा शेवटच्या सामन्यात पराभव झाल्यास जिंकणाऱ्या संघासोबत राजस्थानचा संघही प्ले ऑफसाठी क्वॉलीफाय होईल. त्यामुळे फक्त १४ गुण मिळवलेल्या सर्व संघांना आयपीएलमधून बाहेर पडावं लागेल. यामध्ये पंजाब किंग्ज आणि हैद्राबादच्या संघाचा समावेश आहे. दरम्यान, बंगळुरुचा शेवटचा सामना आज गुरुवारी गुजरात टायटन्स विरोधात सायंकाळी होणार आहे.

IPL 2022 update
जामीन मंजूर होताच मनसे नेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत; म्हणाले...

जर दिल्ली-बंगळुरुचा संघ जिंकला, राजस्थानचा पराभव झाल्यास....

जर दिल्ली आणि बंगळुरु दोघेही त्यांचे सामने जिंकले आणि राजस्थानचा पराभव झाल्यास तिनही संघाचे १६-१६ गुण होतील. त्यामुळे अशा परिस्थितीत नेट रनरेटला खूप महत्व दिलं जाईल. त्यावेळी मायनस रनरेट असलेली आरसीबी आयपीएलमधून बाहेर होऊ शकते. आरसीबीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी ८० किंवा त्यापेक्षाही जास्त धावांच्या अंतराने सामना जिंकावा लागेल. त्यानंतर प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आरसीबीच्या आशा पल्लवीत होतील.

जर दिल्ली-बंगळुरुसोबत राजस्थानचा संघालाही विजय मिळाला, तर...

जर दिल्ली-बंगळुरुच्या संघासोबत राजस्थानच्या संघाला विजय मिळाला, तर राजस्थानचा संघ दुसऱ्या नंबरवर क्वॉलीफाय करेल. लखनऊचा संघ तिसऱ्या नंबरवर जाईल.चौथ्या नंबरसाठी दिल्ली-बंगळुरुमध्ये नेट रनरेटची लढत होईल. त्या परिस्थितीत आरसीबीला ८० किंवा त्यापेक्षाही जास्त धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागेल.

पंजाब-हैद्राबादला चमत्काराची आशा

हैद्राबाद आणि पंजाब टीम १२-१२ गुण मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत.जर दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये क्वॉलीफाय करायचं असेल तर काहीतर चमत्कारचं या संघांच्या आशा पल्लवीत करु शकतं. म्हणजेच, दिल्ली आणि बंगळुरचा त्यांच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव होणं महत्वाचं ठरेल.त्याचसोबत हैद्राबाद आणि पंजाब टीमला त्यांच्या उर्वरित १-१ सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com