
MC stan on sania mirza farewell match: भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आज आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
आज ती फेअरवेलचा सामना खेळणार आहे. या सामन्यात बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅनने तिची भेट घेतली आहे. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)
या महत्वाच्या सामन्यात एमसी स्टॅनने वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली आहे. एमसी स्टॅन फराह खान आणि साजिद खान यांचे खूप चांगले संबंध आहेत.
तसेच सानिया मिर्झा आणि फराह खान हे देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एमसी स्टॅनप्रसिध्द रॅपर आहे, सानिया मिर्झा देखील त्याचे रॅप ऐकत असते.
सानिया मिर्झाने सामना सुरु होण्यापूर्वीच एमसी स्टॅनची भेट घेतली. आपल्या फॅन्ससह सेल्फी क्लीक केल्यानंतर एमसी स्टॅन सानिया मिर्झाची भेट घेण्यासाठी आला. एमएस सी स्टॅन काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून आला.
तर सानिया मिर्झा टेनिस आउटफिटमध्ये दिसून आली. स्टॅनला भेटताच सानियाने मिठी मारली. दोघेही एकमेकांसोबत चर्चा करताना देखील दिसून आले. सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात तो स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. तसेच तो रॅप देखील करताना दिसून आला आहे.
सगळीकडे सध्या एमसी स्टॅनची हवा सुरु आहे. त्याने पॉप्युलॅरीटीच्या बाबतीत अनेक सेलिब्रिटींना मागे सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.