WPL 2023: 'अंबानीने अदानीची पुंगी वाजवली..' मुंबईच्या विजयानंतर भन्नाट मिम्स व्हायरल

मुंबईच्या जोरदार विजयानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
WPL 2023
WPL 2023Saam Tv

WPL 2023 MI-W VS GG-W: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अपेक्षेप्रमाणेच मुंबई आणि गुजरात यांच्यात झालेला सामना रोमांचक ठरला. मात्र शेवटी मुंबईने बाजी मारला आणि हा सामना १४३ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्यात गुजरात संघाची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. (Latest sports updates)

WPL 2023
IND VS AUS indore test: 'भारताने मुद्दाम खराब खेळपट्टी बनवली..' ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची जहरी टीका

मुंबईने ताबडतोड सुरुवात करत २०८ धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हेली मॅथ्यूजने तुफानी खेळी केली. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाचा डाव अवघ्या ६४ धावांवर संपुष्टात आला.

मुंबईच्या जोरदार विजयानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

WPL 2023
IND VS AUS 3rd test :इंदूरची खेळपट्टी खराब म्हणणाऱ्या आयसीसीवर सुनील गावसकर भडकले! गाबाच्या खेळपट्टीवरून सुनावले खडेबोल

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेली मॅथ्यूजने ४७ धावांची तुफानी खेळ केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने १४ चौकारांच्या साहाय्याने ६५ धावा कुटल्या. हे विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिले अर्धशतक ठरले.

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बेथ मुनी पहिल्याच चेंडूवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली.

मुंबईच्या विजयानंतर भन्नाट मिम्स व्हायरल...

मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाओबात रंगणार आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि स्म्रीती मंधाना आमने सामने येणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com