MI VS DC Head To Head : हरमनप्रीत की लेनिंग? कोणता संघ आहे WPL Final जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार? पाहा रेकॉर्ड्स

WPL Final 2023: हा सामना रविवारी पार पडणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड.
MI-W VS DC-W WPL Final 2023
MI-W VS DC-W WPL Final 2023Saam Tv

MI-W VS DC-W WPL 2023 Final : विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत ७२ धावांनी विजय मिळवला.

यासह मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामन्यात जोरदार धडक दिली आहे. विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना रविवारी पार पडणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

MI-W VS DC-W WPL Final 2023
Issy Wong Hat Trick Video: WPL ची पहिली हॅटट्रिक घेत इस्सीने रचला इतिहास,पाहा तो ऐतिहासिक क्षण - VIDEO

कोण कोणावर पडणार भारी?

विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत हे दोन्ही संघ दोन वेळेस आमने सामने आले आहेत. ९ मार्च रोजी पार पडलेल्या पहिल्या सामन्यात ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. तर २० मार्च रोजी हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने आले होते.

यावेळी दिल्लीने पराभवाचा वचपा काढत मुंबईला पराभवाची धूळ चारली होती. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मेग लेनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सने ९ गडी राखून पारभूत केले होते. (Latest sports updates)

त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत बरोबरीचा खेळ पाहायला मिळाला आहे.

MI-W VS DC-W WPL Final 2023
Cricket News: 'मला विष देऊन मारण्याचा रचला कट, शाहिद आफ्रिदीने दिले होते ४०-५० लाख...', पाकिस्तानी क्रिकेटरचा मोठा खुलासा

दोन्ही संघांमध्ये आहेत धाकड फलंदाज..

दिल्ली कॅपिटल्स संघातील फलंदाज सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहेत. आक्रमक फलंदाज मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. लेनिंगने ८ सामन्यांमध्ये ३१० धावा केल्या आहेत.

तर शफाली वर्माने २४१ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, नॅट सिवर ब्रंटने आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. तिने ९ सामन्यांमध्ये २७२ धावा ठोकल्या आहेत.

ती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी तिसरी फलंदाज आहे. तर हेली मॅथ्यूजने ९ सामन्यांमध्ये २५८ धावा केल्या आहेत.

तसेच गोलंदाजांच्या कामगिरीबद्द्ल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाकडून साइका ईशाकने १५ गडी बाद केले आहेत. तर दिल्ली संघाकडून शिखा पांडेने १० गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com