MI vs GT Match Result: राशिद खान लढला, पण एकटा पडला; सूर्याच्या शतकाने साकारला मुंबईचा विजय!
MI vs GT Match Result: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५७ वा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने गुजरातवर धावांनी २७ दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने गुजरासमोर विजयासाठी २१९ धावांचं लक्ष ठेवलं होतं. या लक्षाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ निर्धारीत २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावाच करू शकला. (Latest sports updates)
गुजरातकडून राशिद खानने ७९ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मुंबईकडून युवा गोलंदाज आकाश मढवालने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय पियुष चावला, कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम केली.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेलं २१९ धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाज आकाश मढवालने भेदक मारा करून वृद्धिमान साहाला २ धावांवर बाद केलं.त्यानंतर तिसऱ्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्या बेहनरडॉर्फचया गोलंदाजीवर ४ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शुभमन गिलही ६ धावा काढून तंबुत परतला.
विजय शंकरने मिलरच्या साथीने गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पीयुष चावलाने सेट फलंदाज विजय शंकरला २९ धावांवर बाद केलं. तर बेहरनडॉर्फनेही कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्वस्तात माघारी पाठवलं. त्यानंतर कार्किकेयनं अभिनव मनोहरला २ धावांवर बाद केलं. त्यामुळे ७ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ५६-५ अशी झाली.
दरम्यान, डेव्हिड मिलरने राहुल तेवतियाच्या साथीने गुजरातचा (IPL 2023) डाव सावरला. दोघांनी मिळून सहाव्या विकेट्साठी ४५ धावांची भागिदारी केली. मात्र, आकाशच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलर ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर पीयुष चावलाने राहुल तेवतियाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
एका बाजूला एकापाठोपाठ एक विकेट्स पडत असताना राशिद खान हा फलंदाजीसाठी आला. त्याने शेवटच्या काही षटकात मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. राशिदने ३२ चेंडूत ७९ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि तब्बल १० षटकार ठोकले. राशिद शेवटपर्यंत नाबाद राहिला. मात्र, तो गुजरातला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.
तत्पुर्वी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना (Sport Updates) निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात २१८ धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने शानदार शतकी खेळी केली. सूर्याने ४९ चेंडूत नाबाद १०३ धावा कुटल्या.
आपल्या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार ठोकले. गुजरातकडून राशिद खानने ४ षटकात ३० धावा देत ४ गड्यांना बाद केलं. राशिद खान वगळता (Cricket News) गुजरातचे इतर गोलंदाज हे धावा रोखण्यात अपयशी ठरले.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.