MI VS GT Match Prediction: गुजरात करणार Playoff मध्ये प्रवेश? मुंबई दाखवणार 'या' दोन संघांना बाहेरचा रस्ता

IPL Points Table: आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे
mi vs gt
mi vs gtsaam tv

MI VS GT IPL 2023: आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणारा हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

जर आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने विजय मिळवला, तर आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा गुजरात टायटन्स हा पहीलाच संघ ठरणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघाने जर विजय मिळवला तर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चिंता वाढणार आहे.

mi vs gt
IPL 2023 Points Table: राजस्थानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! मुंबईची चिंता वाढली, तर KKR थेट बाहेर

आज गुजरात टायटन्स संघ करणार प्लेऑफमध्ये प्रवेश ?

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. पहिल्याच हंगामात जेतेपद जिंकून गुजरात टायटन्सच संघाने सर्व संघांना धक्का दिला होता.

तर या हंगामात देखील गुजरात टायटन्स संघ जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. हा संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

जर आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने विजय मिळवला तर गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. गुजरात टायटन्स संघाचे १६ गुण आहेत. आजचा सामना जिंकला तर गुजरातचे १८ गुण होतील. उर्वरित संघ सर्व सामने जिंकले तरी १८ गुण होणार नाहीत. (Latest sports updates)

mi vs gt
Fastest Fifty In IPL History: मानलं रे भावा! मुंबईकर जयस्वालने तुफानी खेळी करत IPL स्पर्धेत रचला इतिहास

मुंबईचा विजय ठरू शकतो डोकेदुखी..

मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर मुंबईचा संघ ११ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. जर आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला तर मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी उडी घेऊ शकतो.

यासह मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र मुंबईचा विजय पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण दोन्ही संघ सर्व सामने जिंकून १६ गुणांपर्यंत पोहचू शकतात. तर मुंबईला उर्वरित सामने जिंकून १८ गुणांपर्यंत पोहचण्याची संधी असणार आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, आकाश मधवाल आणि ख्रिस जॉर्डन.

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकिपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com