MI vs LSG, IPL Eliminator: मुंबई की लखनऊ कुणाचं पारडं जड? एलिमिनेटर खेळलेल्या संघांचा इतिहास तर खूपच वाईट

MI vs LSG, IPL Eliminator: दोन्ही संघांमधील आजवच्या कामगिरीकवर नजर टाकली तर लखनौचं पारडं जड आहे.
MI vs LSG, IPL Eliminator
MI vs LSG, IPL EliminatorSaam TV

MI vs LSG, IPL Eliminator: आयपीएलच्या 16 व्या मोसमातील फायनलमध्ये धडक मारणारा चेन्नई सुपर किंग्स पहिला संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सचा पराभव करत चेन्नईने फायनल गाठली आहे. आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो गुजरातची भिडणार आहे.

दोन्ही संघांमधील आजवच्या कामगिरीकवर नजर टाकली तर लखनऊचं पारडं जड आहे. दोघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले असून लखनऊ संघाने तिन्ही जिंकले आहेत.

आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनौच्या एलिमिनेटरचा हा आकडा पाहता मुंबई आजच्या सामन्यात जिंकू शकतो.

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स  यांच्यात होणार्‍या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ शुक्रवारी 26 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.

MI vs LSG, IPL Eliminator
GT vs CSK Match Result: चेन्नई सुपर डुपर किंग्ज! गुजरातला लोळवून दहाव्यांदा फायनलमध्ये, कुणाशी भिडणार?

एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांचा इतिहास

आयपीएलच्या इतिहासात एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या संघांची कागगिरी खुपच खराब राहिली आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 15 मोसमात एलिमिनेटर खेळणाऱ्या संघाने विजेतेपद पटकावले असे एकदाच घडले. सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये ही कामगिरी केली होती. (Latest sports updates)

MI vs LSG, IPL Eliminator
Ruturaj Gaikwad Catch: अद्भुत, अविश्वसनीय! तुफानी खेळीनंतर ऋतुराजचा मॅच विनिंग कॅच; VIDEO एकदा पाहाच

आयपीएल 2016 मध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता आणि संघाने एलिमिनेटरमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या केकेआरचा 22 धावांनी पराभव केला. यानंतर हैदराबादने क्वालिफायर-2 मध्ये गुजरात लायन्स विरुद्धचा सामना 4 गडी राखून जिंकला.

अंतिम फेरीत हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 8 धावांनी पराभव करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादने हे विजेतेपद पटकावले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com