
WPL 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमध्ये आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. मुंबईने यूपी वॉरियर्सनला पराभूत करत सलग चौथा विजय मिळवला आहे. रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबई गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे.
प्रथम गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सला 6 विकेट्सवर 159 धावांत रोखले आणि त्यानंतर 17.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. हरमनप्रीत कौरने 33 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 53 धावांची तुफानी खेळी केली आणि नताली सिव्हर-ब्रंटने 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 चेंडूत 106 धावांची भागीदारी केली. WPL 2023 मधील हरमनप्रीतचे हे दुसरे अर्धशतक आहे. (Latest Sports News)
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा चार सामन्यांतील हा सलग चौथा विजय आहे. मुंबई संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. चार सामन्यात सलग विजयासह संघाचे आता 8 गुण झाले आहेत. संघाचा नेट रन रेट आता 3.524 झाला आहे. त्याचवेळी यूपी वॉरियर्सला चार सामन्यांमधला दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. यूपी संघ चार गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि नेट रनरेट 0.015 आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.