World Cup 2023: बड्या बड्या बाता...ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणतो भारत नव्हे तर 'हे' संघ २ जाणार वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

Mitchell Marsh Statement: कोणते २ संघ अंतिम फेरीत जाणार याबाबत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे.
Mitchell Marsh Prediction For World Cup 2023
Mitchell Marsh Prediction For World Cup 2023saam tv

Mitchell Marsh Prediction For World Cup 2023:

यंदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली मतं मांडायला सुरूवात केली आहे.नुकताच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शने कोणते २ संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील याबाबत भाष्य केलं आहे.

Mitchell Marsh Prediction For World Cup 2023
Ind vs Pak: आता पाकिस्तानचं काही खरं नाही! महामुकाबल्यासाठी टीम इंडियात २ धाकड खेळाडूंची एन्ट्री

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्टसोबत गप्पा मारताना मिचेल मार्श म्हणाला की, 'खरं सांगायचं झालं तर,मला असं वाटतं की यावेळी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकपचा अंतिम सामना होऊ शकतो.'मिचेल मार्शने भविष्यवाणी करताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रीया द्यायला सुरूवात केली आहे.

भारतासोबत रंगणार पहिला सामना..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.

या सामन्यात विजय मिळवून भारताचा संघ जोरदार सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये झालेल्या स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर २ वेळा भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र जेतेपद पटकावता आले नाही. तर ऑस्ट्रेलियाने २०१५ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. (Latest sports update)

आगामी वनडे वर्ल्डकपसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ..

पॅट कमिंस (कर्णधार), सीन अॅबोट, अॅश्टन एगर, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com