Mithali Raj: अरे वा! मिताली राजने मोडला धोनीचा विक्रम...

कर्णधार मिताली राजनेही (Mitali Raj) नाबाद 57 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
Mithali Raj- MS Dhoni
Mithali Raj- MS DhoniSaam TV

भारतीय महिला क्रिकेट (Indian Womens Cricket Team) संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) पाचव्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. पहिले चार सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने (Team India) शेवटच्या सामन्यात 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 46 षटकांत लक्ष पार करून न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या विजयात स्मृती मंधानाने 71 आणि हरमनप्रीत कौरने 63 धावा केल्या.

कर्णधार मिताली राजनेही (Mitali Raj) नाबाद 57 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मिताली राजच्या या खेळीने तिने धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. मिताली राज धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारी सर्वोत्तम सरासरी ठेवणारी भारतीय खेळाडू ठरली आहे. वनडे क्रिकेटमध्ये विजयाचा पाठलाग करताना मितालीची सरासरी 109.05 आहे. तिने या कालावधीत 2181 धावा केल्या आहेत.

Mithali Raj- MS Dhoni
IPL 2022: मुंबई इंडियन्समुळे बाकी संघ चिंतेत; फ्रँचायझींनी घेतला आक्षेप

धोनीने धावांचा पाठलाग करताना 102.71 च्या सरासरीने 2876 धावा केल्या आहेत. मात्र, आता मिताली राजने त्याला मागे टाकले आहे. विराट कोहलीने विजयाचा पाठलाग करताना 94.66 च्या सरासरीने 5396 धावा केल्या आहेत. स्मृती मांधाना देखील धावांचा पाठलाग करण्यात माहिर फलंदाज आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना तिने 69.94 च्या सरासरीने 1189 धावा केल्या. सुरेश रैनाने 66.60 च्या सरासरीने 1865 धावा केल्या आहेत. स्मृती मंधानाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. मंधानाने 84 चेंडूत 71 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com