Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या 'ड्रीम बॉलने' केली ग्रीनची दांडी गुल! स्टंप उडून पडला ५ फूट लांब- VIDEO

Mohammed shami dream delivery:शमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
mohammed shami
mohammed shamiTwitter

Ind vs Aus 1st ODI: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान या सामन्यात गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने एक भन्नाट चेंडू टाकला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

mohammed shami
IND Vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाची आता काही खैर नाही! टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू परतलाय

नाणेफेक जिंकून हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण ऑस्ट्रेलिया संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १८८ धावांवर संपुष्ठात आला आहे. भारतीय संघाकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले आहेत. शमीने अवघ्या १७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

mohammed shami
Virat Kohli: 'नाटु नाटु' वर विराटचा भन्नाट डान्स , बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल- VIDEO

मोहम्मद शमीचा ड्रीम बॉल..

तर झाले असे की, पहिल्या डावातील तिसावे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. तर कॅमरन ग्रीन फलंदाजी करत होता. या षटकातील तिसरा चेंडू ग्रीनला आत येईल असं वाटलं. मात्र चेंडू सरळ राहिला आणि ऑफ स्टंप उडवून गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय संघाला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान.

वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडतो. असे असताना देखील भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रलियाला १८८ धावांवर रोखलं आहे.

आता भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावांची गरज आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ १-० ची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com