IND vs SL,Asia Cup Final 2023: सिराजचा एक निर्णय श्रीलंकेचे फॅन आयुष्यभर लक्षात ठेवतील, सामना संपल्यानंतर नेमकं काय झालं?

Mohammed Siraj Donates Prize Money: हा सामना झाल्यानंतर मोहम्मद सिराजने मन जिंकणारे कृत्य केले आहे.
Mohammed Siraj Donates Prize Money
Mohammed Siraj Donates Prize Moneytwitter

Mohammed Siraj Donates Prize Money To Ground Staff:

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत मोहम्मद सिराजकडून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे. सिराजने आपल्या ७ षटकांच्या स्पेलमध्ये २१ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने मन जिंकणारे कृत्य केलं आहे.

Mohammed Siraj Donates Prize Money
Asia Cup Prize Money: आशियाचा किंग ठरलेल्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस; विजेत्या, उपविजेत्या संघाला मिळाली तब्बल इतकी रक्कम

सामनावीर म्हणून निवड..

सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या मोहम्मद सिराजला ५००० युएस डॉलर्स रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला की, ' मी सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय मात्र विकेट्स घेण्यात अपयशी ठरत होतो. या सामन्यात मला यश मिळालं. खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. ही बक्षिसाची रक्कम मी ग्राउंड्समनला देत आहे. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा होणं अशक्य होतं.'

आशियाई क्रिकेट मंडळाने केली मोठी घोषणा..

आशिया चषक स्पर्धेत असा एकही सामना नसेल ज्यात पावसाचं आगमन झालं नसेल. मात्र तरीही ग्राउंड्समनने मेहनत घेतली आणि सामना सुरू करण्यासाठी मैदान तयार करून दिलं. त्यांचे आभार मानण्यासाठी आशियाई क्रिकेट मंडळाने ग्राउंड्समनसाठी ५०,००० युएस डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली आहे. (Latest sports updates)

श्रीलंकेने दिलं ५१ धावांचं आव्हान..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेला श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर ऑल आउट झाला. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावांची खेळी केली. तर दूशन हेमंताने नाबाद १३ धावा केल्या.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने अवघ्या २१ धावा खर्च करत सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्याने ३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तसेच संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने १ गडी बाद केला.

Mohammed Siraj Donates Prize Money
IND vs SL, Head To Head Record: भारत विरूद्ध श्रीलंकेत रंगणार आशिया चषकाची फायनल; कसे आहेत ‘हेड टू हेड रेकॉर्ड’?

भारताचा एकतर्फी विजय..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ५१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून ईशान किशन आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली होती.

डावाची सुरुवात करताना दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या डावात ईशान किशनने नाबाद २३ तर शुबमन गिलने नाबाद २७ धावांची खेळी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com