Team India Jersey : टीम इंडिया टी20 विश्वचषकात दिसणार नव्या अवतारात; जर्सीचा लूक आला समोर

टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा लूक समोर आला आहे.
Team India Jersey
Team India Jerseytwitter

Team India Jersey : ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्याच्या १६ तारखेपासून टी२० विश्वचषकाचे सामने सुरु होणार आहे. सदर टी२० विश्वचषक (T20 World Cup) खेळायला टीम इंडिया सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने या टी२० चषकासाठी चांगलीच कंबर कसली आहे. या टी२० विश्वचषकात २३ ऑक्टोबर रोजी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानच्या विरोधात मेलबर्नमध्ये होणार आहे. याचदरम्यान, टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा लूक समोर आला आहे.

Team India Jersey
T20 विश्वचषकाआधी टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' दिग्गज गोलंदाज राहणार संघाबाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत किट स्पॉनर्स 'एमपीएल स्पोर्ट्स'ने मुंबईत १८ सप्टेंबर रोजी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची याआधीची जर्सी ही नेव्ही ब्लू रंगाची होती. मात्र, यंदा जर्सीचा रंग बदलण्यात आला आहे. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू टी२० विश्वचषकात स्काय ब्लू रंगाची जर्सी घालताना दिसतील. तसेच खांद्यावर भडक निळा रंग आहे. विशेष म्हणजे यंदाच्या टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाच्या खेळाडू देखील याच नव्या कोऱ्या जर्सीमध्ये दिसतील.

दरम्यान, मागच्या टी२० विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाला विशेष कामगिरी दाखवता आली नाही. टीम इंडियाला मागच्या वेळी उपांत्य फेरीपर्यंत देखील मजल मारता आली नाही. भारताने अनेक वर्षांपासून टी२० विश्वचषक जिंकला नाही. त्यामुळे बहुतेक भारतीयांची ईच्छा आहे की, यंदाचा टी२० विश्वचषक टीम इंडियाने जिंकावा. टीम इंडियाने याआधी २०१३ साली टी२० विश्वचषक जिंकला होता. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत टी२० विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

Team India Jersey
टी-२० विश्वचषकात ओपनिंग कोण करणार? कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार),केएल राहुल (उप-कर्णधार),विराट कोहली,सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा,ऋषभ पंत (विकेटकीपर),दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या,आर.अश्विन,युजवेंद्र चहल,अक्षर पटेल,जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

Team India Jersey
दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या विमानाच्या इंजिनात झाला बिघाड; त्यानंतर...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com