
IPL 2023 News: आयपीएलच्या १६व्या सीजनला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना मागील सीजनचे विजेते गुजरात टायटन्स आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्समध्ये होणार आहे. दोन्ही संघ मोठ्या विजयाने सीजनची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.
चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलमधील यशस्वी टीम आहे. मात्र मागील सीजन टीमसाठी निराशाजनक होता. कारण सीएसकेला प्लेऑफमध्येही जागा मिळवता आली नाही. यंदाच्या सीजनसाठी संघात नवीन सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बेन स्टोक्स आणि अजिंक्य रहाणेदेखील सीएसकेच्या जर्सीमध्ये यंदाच्या सीजनमध्ये मैदानात दिसतील.
CSK कडून न्यूझीलंडचा ओपनर डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड ओपनिंगला येऊ शकतात. यानंतर अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे यांच्यासह एमएस धोनी अशी बॅटिंग ऑर्डर असू शकते. संघात मोईन अली आणि दुबे यांच्यासह बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू आहेत जे कधीही सामना बदलण्याची ताकद ठेवतात.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेईंग 11
डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिकशन / मिचेल सँटनर.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.