
IPL 2023 Final: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना येत्या २८ मे रोजी पार पडणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. या सामन्यापूर्वी एमएस धोनीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.
धोनीवर फायनल खेळण्यावर येणार बंदी?
चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन्सची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. एमएस धोनीवर फायनलचा सामना खेळण्यावर बंदी येऊ शकते. इन्साईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार,एमएस धोनी क्वालिफायर १ च्या सामन्यात अंपायर सोबत वाद घालताना दिसून आला होता.
ज्यामुळे सामना ४ मिनिटांसाठी थांबवला गेला होता. जर त्याने काही कारण नसताना सामना थांबवला असेल तर, अंतिम सामन्यात त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
काय आहे प्रकरण?
तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाची गोलंदाजी सुरु होती. त्यावेळी मथिशा पथिराना आपले दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी अंपायरने त्याला गोलंदाजी करण्यापासून थांबवलं होतं. यामागचं कारण असं की, पथिराना बाहेर जाऊन परत आत आला होता.
मात्र आत येऊन त्याला केवळ ९ मिनिटे झाली होती. त्यामुळे अंपायर त्याला गोलंदाजी करू देत नव्हते. त्यावेळी एमएस धोनीने ४ मिनिटे सामना थांबवला होता. याबाबत रेफ्रीने कुठलीही अॅक्शन घेतली नाहीये.
मात्र जर त्याच्यावर कारवाई केली गेली तर त्याला सामन्याबाहेर राहावं लागू शकतं. कारण यापूर्वी देखील त्याच्यावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली गेली आहे. (Latest sports updates)
१० व्यांदा चेन्नईने गाठली फायनल..
चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ४ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. आता पाचवे जेतेपद जिंकून या संघाला मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत १० वेळेस अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यादरम्यान ४ वेळेस त्यांना विजय मिळवता आला आहे. तर ४ वेळेस या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे
चेन्नईच्या आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये १४ पैकी ८ सामने जिंकले होते. १७ गुणांसह हा संघ दुसऱ्या स्थानी होता. चेन्नईचा १ सामना पावसामुळे रद्द केला गेला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.