MS Dhoni With Donald Trump: डोनाल्ड ट्रम्पवरही चढला 'माही फिव्हर',अमेरिकेत एकत्र खेळले गोल्फ; VIDEO पाहायलाच हवा

MS Dhoni Playing Golf With Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आणि एमएस धोनीचा गोल्फ खेळत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
MS Dhoni Playing Golf With Donald Trump
MS Dhoni Playing Golf With Donald Trump Twitter

MS Dhoni Playing Golf With Donald Trump Video:

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करून ३ वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याचा क्रेझ काही कमी झालेला नाही. त्याची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

आता त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं. अमेरिकेत आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत असलेल्या एमएस धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

MS Dhoni Playing Golf With Donald Trump
Asia Cup 2023: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता?

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि एमएस धोनी हे दोघेही गोल्फ खेळण्यासाठी एकत्र आले होते. एमएस धोनी यापूर्वी देखील अनेकदा गोल्फ खेळताना दिसून आला आहे. मात्र यावेळी तो एका खास व्यक्तीसोबत खेळताना दिसून आला आहे.

तसेच त्याचा एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात तो झ्वेरेव आणि अल्काराझ यांच्यात झालेला युएस ओपन २०२३ स्पर्धेतील सामना पाहताना दिसून आला होता.

आंतराराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला एमएस धोनी केवळ आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो. आयपीएल २०२३ स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. या स्पर्धेनंतर एमएस धोनीच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता तो पूर्णपणे फिट आहे. (Latest sports updates)

येत्या काही दिवसात भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतात असल्यामुळे भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर २०११ नंतर भारतीय संघाला एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाही.

या स्पर्धेत एमएस धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताला शेवटची आयसीसी ट्रॉफी देखील एमएस धोनीने जिंकून दिली आहे. त्यानंतर २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com