
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद जिंकून दिलं आहे. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर एमएस धोनीचं कौतुक करताना दिसून आला आहे.
गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, ' जर एमएस धोनी कर्णधार नसता तर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला असता आणि धावांचा पाऊस पाडला असता. त्याने भारतीय संघासाठी आणि भारतीय संघाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी आपल्या धावांचा त्याग केला.' भारतीय संघाचा जर रेकॉर्ड पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ असे १५ फलंदाज आहेत ज्यांनी वनडेत १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हे सर्व फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणारे आहेत. (Latest sports updates)
एमएस धोनीच्या नावे आहे या विक्रमाची नोंद..
एमएस धोनी वनडे क्रिकेटमध्ये मिडल ऑर्डर किंवा लोअर मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी यायचा. कारकिर्दीच्या सुरूवातीला तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्यानंतर तो पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा.
गंभीरने भाष्य केल्यानंतर पून्हा एकदा चर्चेला सुरूवात झाली आहे. मात्र गौतम गंभीरचा रोख कोणाकडे होता हे कळू शकलेलं नाही.
एमएस धोनीची कारकिर्द..
एमएस धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३५० वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यादरम्यान त्याने १०७७३ धावा केल्या आहेत. ज्यात १० शतके तर ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९० कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४८७६ आणि ९८ टी-२० सामन्यांमध्ये १२८२ धावा केल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.