मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवाचा दिग्गज खेळाडूला फटका; इयान बिशप म्हणाले..

मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवाचा दिग्गज  खेळाडूला फटका; इयान बिशप म्हणाले..
IPL 2022 Rohit SharmaSaam TV

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत पाचवेळा अजिंक्यपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात आठ सामन्यांमधे भोपळाही फोडता आला नाही. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज सायंकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा त्याच्या वाढदिवशी (Rohit sharma birthday) मुंबईला विजयाचं खातं उघडून देणार का ? या प्रश्नाच्या उत्तराची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सलग आठ सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाल्याने प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर वेस्टइंडिजचा दिग्गज खेळाडू इयान बिशपने (Ian Bishop) मुंबईच्या सद्यस्थितीबाबत खुलासा केला आहे. सतत होणाऱ्या पराभवामुळं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खचून गेला आहे, असं इयान बिशपने म्हटलं आहे.

IPL 2022 Rohit Sharma
Rohit Sharma: रोहित शर्माशी संबंधित 10 मोठे खुलासे अन् रेकॉर्ड

रोहित शर्माला काही बदल करण्याची गरज

शुक्रवारी झालेल्या पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यानंतर इशान बिशपने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. त्यावेळी बिशप म्हणाला, मुंबई इंडियन्सचा गेल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मी रोहित शर्मासोबत चर्चा केली होती. त्यामुळे रोहित सतत होणाऱ्या पराभवामुंळं खचून गेला असल्याचं दिसलं. मला असं वाटतंय की, रोहितने काही वैयक्तीक बदल करण्याची गरज आहे.

टिम डेविडला मुंबई इंडियन्समध्ये खेळवलं पाहिजे

आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या बिशप यांनी म्हटलं की, मुंबई इंडियन्सच्या संघात टिम डेविडला खेळवलं पाहिजे. मुंबई संघात त्याला का खेळवलं जात नाही, याबाबत मला काही कल्पना नाही. मुंबईला फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची गरज आहे. मुंबईने अशा एका खेळाडूवर विश्वास ठेवला पाहिजे जो मोठी धावसंख्या उभी करु शकतो. सुर्यकुमार यादव दमदार कामगिरी करत आहे. दरम्यान, आज शनिवारी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. आज रात्री मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सचा राजस्थान विरुद्ध पराभव झाल्यास मुंबईची टीम यंदाच्या आयपीएलमधून पूर्णपणे बाहेर जाईल.

रोहित शर्माच्या नावावर ४१ आंतरराष्ट्रीय शतक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत ४५ टेस्ट, २३० वनडे आणि १२५ टी-ट२० सामने खेळले आहेत. रोहितने एकदिवसीय सामन्यात ९२८३, टेस्टमध्ये ३१३७ आणि टी-२० मध्ये ३३१३ धावा फटकावल्या आहेत. रोहितने आतापर्यंत ४१ आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहेत. यामध्ये टेस्ट ८, वनडे २९ आणि टी-२० च्या ४ शतकांचा समावेश आहे. रोहितने आयपीएलमध्ये २२१ सामने खेळले असून ५७६४ धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.