Mumbai Indians Jersey: 'मुंबईची जर्सी मुंबईची फिलिंग..' पलटण,पाहा मुंबईच्या नव्या जर्सीची पहिली झलक

नुकताच मुंबई इंडियन्सने आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.
mumbai indians
mumbai indiansTwitter

Mumbai Indians new jersey: आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ३१ मार्चपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्व संघांनी सराव करायला सुरुवात केली आहे.

तसेच आपल्या संघाच्या जर्सीचे अनावरण करायला देखील सुरुवात केली आहे. नुकताच मुंबई इंडियन्सने आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. (Latest sports updates)

mumbai indians
Ind vs Aus 4th Test: …म्हणून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुंबईकरांचं धकाधकीचं आयुष्य दाखवलं आहे. तसेच व्हिडिओला हटके कॅप्शन देखील दिले आहे.

त्यांनी कॅप्शन म्हणून मुंबईची जर्सी मुंबईची फिलिंग असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव,तिलक वर्मा आणि ईशान किशन मुंबईच्या जर्सीमध्ये दिसून येत आहेत.

तसेच या जर्सीबद्दल बोलायचं झालं तर ही जर्सी नेहमीप्रमाणेच गडद निळ्या रंगाची आहे. तसेच या जर्सीच्या खांदयावर सोनेरी रंगाच्या पट्ट्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला हंगाम सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.

mumbai indians
IND VS AUS 4th test: चौथा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया इतिहास रचणार! जगातील कुठल्याच संघाला न जमलेला पराक्रम करण्याची संधी

तर वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. मात्र जोफ्रा आर्चरचे पुनरागमन होणार असल्याने मुंबईची गोलंदाजी आणखी मजबत होऊ शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com