MI vs GG HIGHLIGHTS : मुंबई जिंकली रे! MIने सलग पाचव्या सामन्यात जिंकून केली कमाल; गुजरातचा ५५ धावांनी उडवला धुव्वा

मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला गुजरातचा संघ ५५ धावांनी पराभूत झाला.
MI vs GG HIGHLIGHTS
MI vs GG HIGHLIGHTSSaam tv

मुंबई : वुमेन प्रीमिअर लीगच्या १२ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा ५५ धावांनी दारुण पराभव केला. मुंबई या स्पर्धेत सलग पाचवा विजय जिंकला आहे.तर गुजरातने पाच सामन्यापैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजीला उतरत आठ गडी गमावून १६२ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला गुजरातचा संघ ५५ धावांनी पराभूत झाला. (Latest Marathi News)

मुंबई इंडियन्सच्या १६३ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात जायंट्सला पहिल्याच चेंडूत धक्का बसला. नेट सीव्हर ब्रंटने सोफिया पायचित केले. त्यामुळे सोफिया शून्य धावांवर तंबूत परतली. त्यानंतर गुजरात सहाव्या षटकात दोन धक्के बसले. हेली मॅथ्यूजने मेघनाला झेलबाद केले.

तर शेवटच्या चेंडूत तिने अॅनाबेल सदरलँडला बाद केले. सदरलँड शून्य धावांवर बाद झाली. गुजरातला ९ व्या षटकात चौथा धक्का बसला. या षटकात हरलीन पायचित झाली. तर १० व्या षटकात अॅश्ले बाद झाली. पुढे ८५ धावांवर सात गडी बाद झाले होते. दयालन आणि स्नेह राणा २० धावा करत बाद झाली.

त्यानंतर किम गर्थ ही आठ आणि तनुजा कांवर शून्य धावांवर बाद झाली. गुजरतचा संघ २० षटकात केवळ १०७ धावाच ठोकू शकला. त्यामुळे मुंबईने सहज सामना खिशात टाकला.

MI vs GG HIGHLIGHTS
Ind vs Aus ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा दणका, कॅप्टनच बदलला

मुंबई इंडियन्स संघाने १६३ धावांचे आव्हान गुजरात जायंट्सला दिले होते. मुंबईने (Mumbai) नाणेफेकीचा कौल हरत २० षटकात ८ गडी गमावून १६२ धावा ठोकल्या. या सामन्यात हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ५१ धावा कुटल्या. यास्तिका भाटियाने ४४ धावा कुटल्या होत्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com