M Sreeshankar : चर्चा चर्चा ! मुरली श्रीशंकरच्या जिद्दीची चर्चा; लांब उडीत पटकाविलं राैप्य (व्हिडिओ पाहा)

गेले दाेन दिवसांपासून भारतीय खेळाडूंनी काॅमनवेल्थ गेम्समध्ये देशाचा दबदबा निर्माण केला आहे.
Murali Sreeshankar
Murali Sreeshankarsaam tv

M Sreeshankar : काॅमनवेल्थ गेम्सच्या (Common Wealth Games 2022) मैदानी क्रीडा (sports) प्रकारात भारताच्या तेजस्विन शंकर (Tejaswin Shankar) याच्या यशानंतर धावपटू हिमा दास (Hima Das) हिने उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर लांब उडीत मुरली श्रीशंकरने (murali sreeshankar) रौप्यपदक पटकावून स्पर्धेतील देशाचा दबदबा कायम राखला आहे.

आजचं यश हे श्रीशंकरला संघर्षानंतर मिळालं. त्याने चौथ्या प्रयत्नात आठ मीटर मारलेली उडी पंचांनी अवैध ठरवली. यामुळे ताे निराश झाला परंतु त्याने जिद्दी पुढच्या प्रयत्नांत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारून भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली. या नाेंदीपुर्वी श्रीशंकर हा सहाव्या स्थानावर हाेता आणि नंतर ताे दुसऱ्या स्थानावर पाेहचला.

Murali Sreeshankar
CWG : पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरची सुवर्ण कामगिरी (व्हिडिओ पाहा)

नैर्नेनं मिळविलं सुवर्ण

श्रीशंकर यान आठ मीटरपेक्षा जादा लांब उडी मारली होती, मात्र लँडींग बोर्डवर एक सेंटीमीटरच्या फरकाने त्याचा हा प्रयत्न वैध नसल्याचं पंचांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे श्रीशंकरचा निराश झाला. त्यानंतर त्याने जिद्दीने पुढील कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले. बहामासच्या लॅक्यून नैर्नेने या स्पर्धेत श्रीशंकर यास पिछाडीवर टाकलं आणि सुवर्णपदक प्राप्त केले.

मुरली श्रीशंकर हा केरळ येथील पलक्कडचा असून लांब उडी क्रीडा प्रकारात काॅमनवेल्थ गेम्समध्ये पदक पटकाविणारा ताे पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापुर्वी लांब उडीत देशाच्या दोन महिला खेळाडूंनी देशास पदक मिळवून दिले आहे. पुरुषांच्या गटात श्रीशंकरनं आपली पहिली माेहाेर उमटवली आहे. त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन हाेऊ लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com