India Open 2022: अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या कन्येने साईना नेहवालला हरवलं

या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला आजपासून प्रारंभ झाला आहे.
malvika bansod defeated saina nehwal in india open 2022
malvika bansod defeated saina nehwal in india open 2022saam tv

नवी दिल्ली : केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये सुरू असलेल्या इंडियन ओपन 2022 (India Open 2022) बॅडमिंटन स्पर्धेत भारताची नामांकित खेळाडू सायना नेहवाल (saina nehwal) हिचा नागपूरच्या मालविका बनसोडने (malvika bansod) हिने पराभव केला. यामुळं साईनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. (Malvika Bansod defeated Saina Nehwal In the second round match of India open 2022)

malvika bansod defeated saina nehwal in india open 2022
Tasnim Mir: १६ वर्षीय तसनीम मीरने रचला इतिहास, पीव्ही सिंधू-सायना नेहवालही करू शकले नव्हते

३५ मिनिटे चाललेल्या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात साईना नेहवालला पराभवाचा धक्का बसला. साईना पहिल्या सेटमध्ये ५-७ अशी पिछाडीवर होती. मालविकाने तिचे मनाेबल वाढवत साईनावर २१-१७ असा सेटमध्ये विजय मिळविला. त्यानंतर मालविकाने आत्मविश्वासाने खेळ करीत आपले सारे काैशल्यपणास लावत ३५ मिनिटांत सामना खिशात घातला. आजच्या सामन्यात मालविकाने साईनाला २१-१७, २१- ९ असं हरवलं. (malvika bansod defeated saina nehwal in india open 2022)

दरम्यान आजच्या सामन्यात साईना नेहवालचा (saina nehwal) पराभव केल्यानंतर मालविका बनसाेड हिच्यावर समाज माध्यमातून काैतुकाचा वर्षाव हाेत आहे. नागरपूरच्या क्रीडा रसिकांनी तर तसेच बॅडमिंटन (badminton) क्षेत्रात तिच्या विजयाबद्दल ठिकठिकाणी जल्लाेष केला.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com