Cricket News: 'या' बॉलरनं रचला इतिहास; भारताच्या महान गोलंदाजाचा मोडला विक्रम

एकाच कसोटीत ९ विकेट घेऊन या फिरकीपटूनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या महान गोलंदाजालाही त्यानं मागे टाकलं आहे.
Nathan Lyon Test cricket Record Latest News in Marathi
Nathan Lyon Test cricket Record Latest News in MarathiSAAM TV

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन याने कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. श्रीलंकाविरुद्ध गाले कसोटीत ९ विकेट घेऊन लायन याने भारताचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. लायनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४३६ विकेट आहेत. त्याच्या गोलंदाजीमुळं ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत श्रीलंकेला १० विकेट राखून मात दिली. (Sri Lanka vs Australia Galle Test)

Nathan Lyon Test cricket Record Latest News in Marathi
Neeraj Chopra : डायमंड लीग स्पर्धेत नीरज चाेप्राची उत्तंग कामगिरी (व्हिडिओ पाहा)

ऑस्ट्रेलियानं दिग्गज ऑफ स्पिनर नॅथन लायन (Nathan Lyon) याच्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात १० विकेटने विजय मिळवला. गाले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाच्या (Sri Lanka vs Australia) समोर विजयासाठी केवळ चार धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं अवघ्या चार चेंडूंतच पूर्ण केलं आणि हा सामना जिंकला.

गाले कसोटीत (Test Cricket) श्रीलंकेचा संघ दोन्ही इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही. श्रीलंकेनं पहिल्या डावात २१२ धावा आणि दुसऱ्या डावात अवघ्या ११० धावा केल्या. श्रीलंकेच्या फलंदाजांनी लायनच्या फिरकीसमोर अक्षरशः नांगी टाकली. लायन याने पहिल्या डावात पाच विकेट घेतले. तसेच दुसऱ्या डावातही त्यानं श्रीलंकेच्या चार फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह लायननं भारताचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनाही मागे टाकले.

Nathan Lyon Test cricket Record Latest News in Marathi
भारतीय हॉकी संघात काेराेनाचा शिरकाव; दाेन खेळाडूंसह पाच जणांना लागण

नॅथन लायनचे कसोटीत ४३६ विकेट

नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये १०९ सामन्यांत ४३६ विकेट घेतल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी १३१ सामन्यांत ४३४ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये टॉप १० गोलंदाजांच्या यादीतही लायननं स्थान पटकावलं आहे.

टॉप १० गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन गोलंदाज

लायन यानं जगातील टॉप १० गोलंदाजांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. त्याच्यासह सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलंदाज शेन वॉर्न (७०८ विकेट) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३ विकेट) यांचाही समावेश झाला आहे. या यादीत शेन वॉर्न दुसऱ्या आणि मॅकग्रा पाचव्या स्थानी आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com