Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्रा करणार देशाचे नेतृत्व; जाणून घ्या भारतीय संघ

भारतीय संघात निवडलेले खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेपुर्वी USA मधील चुला व्हिस्टा येथे प्रशिक्षण घेतील.
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्रा करणार देशाचे नेतृत्व; जाणून घ्या भारतीय संघ
Neeraj Choprasaam tv

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games) देशाचा मैदानी स्पर्धेसाठीचा (ऍथलेटिक्स) संघ गुरुवारी एफआयने (athletics federation of india) जाहीर केला. या संघाचे नेतृत्व ऑलिंपिकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यंदा एएफ आयने AFI जाहीर केलेल्या संघात 18 महिला खेळाडूंना (players) स्थान मिळालेला आहे. यामध्ये हिमा दास आणि दुती चंद या गुणवान खेळांडूचा देखील महिला संघात रिलेसाठी समावेश झालेला आहे. (common wealth games indian athletics team latest marathi news)

AFI चे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले ज्यांना फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्यास सांगितले गेले आहे आणि जे परदेशात स्पर्धा करत आहेत ते खेळाडू वगळता निवडलेले अन्य खेळाडू 28 जुलै ते आठ ऑगस्ट राष्ट्रकुल स्पर्धेपुर्वी USA मधील चुला व्हिस्टा येथे प्रशिक्षण घेतील. त्यांच्या व्हिसाच्या प्रतीक्षेत आम्ही आहाेत.

Neeraj Chopra
WWE चा निर्णय समजताच सुपरस्टार शाशा बॅंकचे चाहते घायाळ

असा आहे निवडलेला भारतीय संघ

पुरुष : अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेस), नितेंदर रावत (मॅरेथॉन), एम श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया (लांब उडी), अब्दुल्ला अबुबकर, प्रवीण चित्रवेल आणि एल्डोस पॉल (ट्रिपलचेस), तेजिंदरपाल सिंग तूर (शॉट थ्रो) ); नीरज चोप्रा, डीपी मनू आणि रोहित यादव (भालाफेक), संदीप कुमार आणि अमित खत्री; अमोज जेकब, नोहा निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथन पांडी आणि राजेश रमेश (4×400 मीटर रिले).

Neeraj Chopra
खेलो इंडियातील खेळाडूंसाठी 'साई' देणार पॉकेटमनी; २१८९ खेळाडूंसाठी ६.५२ कोटींची तरतूद

महिला: एस धनलक्ष्मी (100 मी आणि 4×100 मीटर रिले), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा), ऐश्वर्या बी (लांब उडी आणि तिहेरी उडी) आणि अँसी सोजन (लांब उडी), मनप्रीत कौर (शॉट थ्रो), नवजीत कौर धिल्लॉन आणि सीमा अंतिल पुनिया ( डिस्क थ्रो), अन्नू राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक), मंजू बाला सिंग आणि सरिता रोमित सिंग (वायर शॉट), भावना जाट आणि प्रियांका गोस्वामी, हिमा दास, दुती चंद, श्रावणी नंदा, एमव्ही जिलाना आणि एनएस सिमी (4x100m रिले).

Edited By : Siddharth Latkar

Neeraj Chopra
अजिंक्यतारा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले; प्रशासनासह शेतकरीही खूष
Neeraj Chopra
एमआयडीसीतील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणी तिघे अटकेत
Neeraj Chopra
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? मग कशासाठी 'हा' आटापिटा : सदाभाऊ खाेत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com