नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, फिनलँडमध्ये  मिळवलं सुवर्णपदक
Neeraj ChopraSaam Tv

नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, फिनलँडमध्ये मिळवलं सुवर्णपदक

नीरज चोप्राने येथे विक्रमी 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

Kuortane Games 2022: टोकियो ऑलिम्पिक 2020 सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने शनिवारी फिनलँडमध्ये सुरू असलेल्या कुओर्तने गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. नीरज चोप्राने येथे विक्रमी 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही दुसरी स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता नीरज आता 30 जून रोजी डायमंड लीगच्या स्टॉकहोम लीगमध्ये भाग घेणार आहे.

नीरजने फिनलँडमध्ये काही दिवसांपूर्वी नुरमी गेम्समध्ये 89.30 मीटर अंतरापर्यंत भाला फेकत स्वत:चाच ऑलिम्पिकमधील आणि राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला होता. नीरजने गेल्या आठवड्यात तुर्कुमध्ये 89.30 मीटर पर्यंत भाला फेकत पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. त्यावेळी तो 90 मीटरपासून 70 सेंटीमीटरने चुकला होता. तर त्यावेळी फिनलँडमधील स्पर्धेत 25 वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने 89.83 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव आपले नाव कोरले. पहिल्याच प्रयत्नात नीरजने 86.89 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याचा पुढचा प्रयत्न फाऊल ठरला तर तिसऱ्या प्रयत्नात तो भाला फेकताना घरसला.

Neeraj Chopra
बदलापूर पालिका पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज; २ नव्या स्पीडबोट खरेदी

स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला

नीरज चोप्राने मंगळवारी फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले, त्यादरम्यान त्याने स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही मोडला. नीरजने येथे 89.30 मीटर अंतरावर भाला फेकला. याआधी ताच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मार्च 2021 मध्ये झाला होता. त्यावेळी त्याने 88.07 मीटर अंतरावर भाला फेकला होता. याशिवाय टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 24 वर्षीय नीरजला 7 ऑगस्ट 2021 रोजी सुवर्णपदक मिळाले, त्यानंतर तो प्रथमच एका स्पर्धेत भाग घेत होता आणि त्याने थेट राष्ट्रीय विक्रम केला. नीरज चोप्रा आता 30 जून रोजी डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगमध्ये सहभागी होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com