Virat Kohli- Naveen Ul haq: नवीन उल हकचं जास्तच होतंय ! विराटची विकेट पडताच नवीनने काढली विराटची खोड ; फोटो होतोय व्हायरल

Naveen Ul haq Instagram Story: नवीनने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत विराटला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे.
virat kohli naveen ul haq
virat kohli naveen ul haqsaam tv

MI VS RCB IPL 2023: विराट आणि नवीन उल हक यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

मैदानावर वाद झाल्यानंतर आता दोघेही सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांना डिवचताना दिसून येत आहे. नुकताच मुंबई इंडियन्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.

या सामन्यानंतर नवीनने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत विराटला डिवचल्याचे पाहायला मिळाले आहे.

virat kohli naveen ul haq
Virat Kohli-Gautam Gambhir: माघार घेईल तो किंग कोहली कसला; लखनऊच्या पराभवानंतर विराटने गंभीरला नकळत डिवचलं

काही दिवसांपुर्वी लखनऊ सुपर जांयट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने जोरदार विजय मिळवला होता. या विजयानंतर विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून स्टोरी शेअर केली होती. ज्यात त्याने वृद्धिमान साहा आणि रशीद खानचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. वृद्धिमान साहाने या सामन्यात तुफानी खेळी केली होती. तर राशिद खानने भन्नाट झेल टिपला होता.

नवीन उल हकची प्रत्युत्तर देणारी स्टोरी...

विराटने गुजरातच्या खेळाडूंचे कौतुक करत लखनऊ सुपर जायंट्स संघावर निशाणा साधला होता. आता विराटच्या विकेटवर आणि रॉयल चॅलेंजर्स संघाच्या पराभवावर नवीन उल हकने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

ही स्टोरी शेअर करत नवीन उल हकने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. विराटचा विकेट जाताच त्याने आंबा खात असल्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पराभूत होण्याच्या वाटेवर होता. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा आंबे खात असल्याचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याचा आनंद द्विगुणित झाला होता. असं त्याचं म्हणणं आहे. (Latest sports updates)

मुंबईचा जोरदार विजय..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने ६५ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली.

तर नेहाल वढेराने नाबाद ५२ धावांची खेळी केली. मुंबईने या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com