New Zealand vs India, 1st ODI : श्रेयस अय्यरनं 'पॉवर' दाखवली, टीम इंडियाचा धावांचा डोंगर, न्यूझीलंडला लोळवणार का?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात भारतीय संघानं धावांचा डोंगर उभारला आहे.
New Zealand vs India 1st ODI/ICC
New Zealand vs India 1st ODI/ICC SAAM TV

New Zealand vs India, 1st ODI Score Update : टीम इंडियानं ऑकलँड वनडेमध्ये धमाकेदार कामगिरी केली. शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरनं उत्तम फलंदाचजी करत ३०६ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून तिघांनी अर्धशतके केली. धवन - गिलनं अर्धशतकी खेळी केली. मात्र, सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकांमध्ये केलेली तुफानी फटकेबाजी. त्यानं ७६ चेंडूंमध्ये ८० धावा कुटल्या.

श्रेयस अय्यरनं आपल्या डावात ४ षटकार आणि ४ चौकार लगावले. संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या साथीने महत्वाची भागीदारी रचली. त्यामुळे संघाची धावसंख्या तीनशे पार पोहोचली. अय्यर भले शतकापासून दूर राहिला मात्र, त्याने गेल्या आठ वनडे सामन्यांमध्ये केलेल्या ५१२ धावा उल्लेखनीय आहेत. (Sports News)

New Zealand vs India 1st ODI/ICC
Team India : टीम इंडियाच्या सामन्याचं ठिकाण अचानक बदललं, का घ्यावा लागला हा निर्णय?

वनडेमध्ये श्रेयस सरस

श्रेयस अय्यर टी-२० प्रकारात सातत्यानं अपयशी ठरला. पण त्यानं वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली. श्रेयस अय्यर हा वनडे फॉरमॅटमध्ये चमकतोय. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. या फलंदाजाच्या बॅटमधून गेल्या आठ डावांत ५१२ धावा निघाल्या आहेत. त्यात पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात तो दोनदा नाबाद राहिला आहे. (Cricket News)

New Zealand vs India 1st ODI/ICC
Dinesh karthik Video : 'फिनिशर' दिनेश कार्तिक खरंच संन्यास घेणार? सोशल मीडिया पोस्टद्वारे संकेत

न्यूझीलंडमध्ये श्रेयसची कडक कामगिरी

न्यूझीलंडमध्ये श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करतोय हे आतापर्यंत तरी दिसून आले आहे. मागील न्यूझीलंडच्या दौऱ्यात वनडे मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. अय्यरने ७२ पेक्षा अधिक सरासरीने २१७ धावा केल्या होत्या. आता पुन्हा श्रेयस अय्यर न्यूझीलंडसाठी कर्दनकाळ ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com