ENG vs NZ [Watch]: न्यूझीलंडचा ‘फ्लाईंग मॅन’ फिलिप्सने हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, Video पाहाच

Glenn Phillips Catch: या सामन्यात फिलिप्सने भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Glenn Phillips Catch
Glenn Phillips CatchTwitter

Glenn Phillips Catch Video:

सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ४ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंड संघाने ७९ धावांनी विजय मिळवला आहे.

हा सामना जरी इंग्लंडने जिंकला तरी मनं मात्र न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने जिंकली आहे. त्याने या सामन्यात एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Glenn Phillips Catch
IND vs PAK, Asia Cup: क्रिकेटच्या मैदानांना छप्पर का नसतं? वाचा ३ प्रमुख कारणं

ग्लेन फिलिप्सला आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक का म्हटलं जातं हे जातं हे त्याने पून्हा एकदा दाखवून दिलं आहे. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात मोईन अलीला बाद करण्यासाठी डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे. हा झेल पाहून सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांसह स्वत: मोईन अली देखील आश्चर्यचकीत झाला होता.

तर झाले असे की, इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना न्यूझीलंडकडून २१ वे षटक टाकण्यासाठी टीम साऊदी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी मोईन अली ३३ धावांवर फलंदाजी करत होता.

त्यावेळी षटकातील तिसरा चेंडू त्याने शॉर्ट टाकला ज्यावर मोईन अलीने लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.मात्र चेंडू बॅटचा कडा घेत हवेत गेला. त्यावेळी कवर पाँईटला उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्स धावत येऊन पुढच्या बाजूला डाईव्ह मारली आणि अविश्वसनीय झेल टिपला. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना लियाम लिविंगस्टनने नाबाद ९६ धावांची खेळी केली.

इंग्लंडने या डावात ७ गडी बाद २२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १४७ धावांवर संपूष्ठात आला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com